‘किरीट सोमय्यांनी फक्त भो भो करु नये, आरोप सिद्ध करावे’, किशोरी पेडणेकर भडकल्या

| Updated on: Sep 01, 2020 | 10:12 PM

"भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फक्त आरोप करु नयेत. त्यांनी ते सिद्ध करावे", असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या (Mayor Kishori Pednekar slams Kirit Somaiya).

किरीट सोमय्यांनी फक्त भो भो करु नये, आरोप सिद्ध करावे, किशोरी पेडणेकर भडकल्या
Follow us on

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाची कंपनी ज्या पत्त्यावर नोंद आहे, त्याच पत्त्यावर आणखी आठ कंपन्यांची नोंदणी आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर किशोरी पेडणेकर चांगल्याच भडकल्या आहेत. “किरीट सोमय्या यांनी फक्त भो भो न करता आरोप सिद्ध करावे”, असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी केला (Mayor Kishori Pednekar slams Kirit Somaiya).

“भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फक्त आरोप करु नयेत. त्यांनी ते सिद्ध करावे, असं माझं त्यांना आवाहन आहे. याप्रकरणी 100 टक्के चौकशी व्हावी. आरोप सिद्ध झाले तर मी राजीनामा देवून राजकारणातून निवृत्त होईन. आरोप सिद्ध न झाल्यास किरीट सोमय्या यांनी राजकारणातून कायमचं निवृत्त व्हावं. मी आतापर्यंत कधीच बोगस काम केलं नाही. यापुढेही करणार नाही”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली (Mayor Kishori Pednekar slams Kirit Somaiya).

हेही वाचा : ‘पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?’ मनसेचा मुंबईच्या महापौरांवर निशाणा

या प्रकरणावरुन शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली. “अस्तित्व दाखवण्यासाठी हे सुरु आहे. त्यांनी आतापर्यंत राजकीय नेत्यांवर जेवढे आरोप केले त्याचे पुढे काय झाले? त्यातून हा माणूस किती पोकळ आहे ते समजते. किरीट सोमय्यांची टीका ही गैर आणि लांच्छनास्पद आहे”, असं अरविंद सावंत म्हणाले.

किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?

“महापौर किशोरी पेडणेकर यांच्या चिरंजीवाच्या कंपनीला महापालिकेचं कंत्राट मिळालं आहे. ही कंपनी ज्या पत्त्यावर नोंद आहे, त्याच पत्त्यावर आणखी आठ कंपन्याची नोंदनी आहे. या सर्व कंपन्या बोगस असल्याची शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणी महाराष्ट्र सरकारकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे”, असं किरीट सोमय्या ट्विटरवर म्हणाले.

भाजपआधी मनसेचा आरोप

‘किश कॉर्पोरेट सर्व्हीसेस इंडिया’ या कंपनीला महापालिकेकडून कोव्हिड सेंटर उभारण्याचे कंत्राट देण्यात आल्याचा दावा गेल्या महिन्यात मनसेकडून करण्यात आला आहे. “किशोरी पेडणेकर यांचे सुपुत्र साईप्रसाद किशोर पेडणेकर हे या कंपनीचे संचालक आहेत. महापौरांनी आपल्या पदाचा दुरोपयोग करुन आपल्या मुलाच्या कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट दिले”, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. मनसे पाठोपाठ भाजपनेही किशोरी पेडणेकर यांच्यावर गभीर आरोप केले आहेत.