Ajit Pawar : वारीच्या मार्गावरील मासांहाराची दुकाने आणि दारुची दुकाने वारीकाळात बंद ठेवणार?

| Updated on: Jun 05, 2022 | 7:17 PM

पालखी मार्गात कोणकोणत्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, याची माहिती अजित पवारांना देण्यात आलीय. महत्वाची बाब म्हणजे वारीच्या मार्गावरील रस्त्याच्या बाजूची मांसाहाराची, दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : वारीच्या मार्गावरील मासांहाराची दुकाने आणि दारुची दुकाने वारीकाळात बंद ठेवणार?
अजित पवार यांच्या उपस्थितीत आषाढी वारीबाबत बैठक
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) काहीसा कमी झाल्यानंतर यंदा आषाढी वारीचा सोहळा भक्तीभावाने मोठ्या उत्साहात पार पडणार असं दिसत होतं. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला 1 हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशावेळी यंदाच्या आषाढी वारीवरही (Ashadhi Wari) कोरोनाचं सावट असणार का? असा प्रश्न विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी अजित पवार यांच्यासमोर पालखी मार्गांचं वेळापत्रक सादर करण्यात आलं. तसंच पालखी मार्गात कोणकोणत्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याचीही माहिती अजित पवारांना देण्यात आलीय. महत्वाची बाब म्हणजे वारीच्या मार्गावरील रस्त्याच्या बाजूची मांसाहाराची, दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे.

अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीला आळंदी देवस्थानचे अध्यक्ष विकास ढगे, देहू संस्थांचे अध्यक्ष नितीन मोरे यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर हे देखील या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर ज्या तीन जिल्ह्यातील पालखी मार्ग जातो त्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही या बैठकीत सहभागी झाले होते.

वारी दरम्यान वारकऱ्यांसाठी कोणत्या सोयी सुविधा?

>> पालखी मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

>> 1 हजार 800 फिरत्या शौचालयांची सुविधा देण्यात आली

>> फिरत्या शौचालयापैकी 50 टक्के शौचालये महिलांसाठी राखीव

>> सॅनिटायझर, औषधं, डॉक्टरांची व्यवस्था पालखी मार्गावरील जिल्हा परिषद विभाग करणार

>> वारीच्या मार्गावरील रस्त्याच्या बाजुची मांसाहार, दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता

>> वारी काळात एक मोबाईल अॅप तयार करण्यात येणार

>> विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन लाईव्ह मिळण्याची सोय

आळंदीला रोज पाणी द्या, अजितदादांचे आदेश

अजित पवार यांच्याकडे वारकऱ्यांना आळंदीला दररोज पाणी द्या, एक दिवसाआड पाणी नको अशी मागणी केली आहे. त्यावर 11 एमएलडी पाणी देऊनही वारकऱ्यांना पाणी का मिळत नाही? असा प्रश्न अजित पावर यांनी अधिकाऱ्यांना विचारला. मला अजिबात कारणं नको. आळंदीला रोज पाणी मिळालं पाहिजे, असं अजितदादांनी अधिकाऱ्यांना बजावलं आहे.

‘सोलापूर जिल्ह्यात पालखी तळासाठी जागा द्या’

त्याचबरोबर सोलारूर जिल्ह्यात पालखी तळासाठी जागा देण्याची मागणीही अजित पवार यांच्याकडे करण्यात आलीय. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत जागेची अडचण येत आहे. शेती महामंडळाच्या जागा आम्हाला द्या, अशी मागणी यावेळी वारकऱ्यांकडून करण्यात आलीय.