AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi Video: मेटाने फेसबुकवरुन चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Video उडवला, त्यानंतर थेट…

मेटाने फेसबुकवरून पंतप्रधान मोदींची पोस्ट काढून टाकल्याबद्दल माफी मागितली आहे. मेटाने म्हटले आहे की, तांत्रिक त्रुटीमुळे पंतप्रधानांचा व्हिडिओ काढून टाकण्यात आला होता. ही त्रुटी नंतर दुरुस्त करण्यात आली आणि काढून टाकलेला व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्यात आला आहे.

Narendra Modi Video: मेटाने फेसबुकवरुन चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Video उडवला, त्यानंतर थेट...
| Updated on: Jul 28, 2026 | 12:44 PM
Share

मेटाने फेसबुकवरून पंतप्रधान मोदींची पोस्ट काढून टाकल्याबद्दल माफी मागितली आहे. मेटाने म्हटले आहे की, तांत्रिक त्रुटीमुळे पंतप्रधानांचा व्हिडिओ काढून टाकण्यात आला होता. ही त्रुटी नंतर दुरुस्त करण्यात आली आणि काढून टाकलेला व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ भारतात फेसबुकवर तात्पुरता अनुपलब्ध झाला होता, ज्यामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली. व्हिडिओ उघडल्यावर, काही युजर्संना हा व्हिडिओ उपलब्ध नाही, असा संदेश दिसला. मात्र, त्यानंतर थोड्याच वेळात व्हिडिओ पुन्हा उपलब्ध करण्यात आला. मेटाने आता या प्रकरणी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले, “हा व्हिडिओ चुकून काढून टाकण्यात आला होती आणि आता तो पुन्हा अपलोड करण्यात आला आहे.” कंपनीने स्पष्ट केले की व्हिडिओ काढून टाकणे ही एक तांत्रिक त्रुटी होती आणि तो आता नेहमीप्रमाणे उपलब्ध आहे.

मेटाने काय म्हटले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जुलै 2026 रोजी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. मेटाने त्यांचा व्हिडिओ काढून टाकल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी आक्षेप नोंदवला. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला. पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ सेल्फी मोडमध्ये रेकॉर्ड केला होता. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी त्यांनी या व्हिडिओचा वापर केला होता. मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले, “व्हिडिओ चुकुन काढून टाकण्यात आला होता आणि ती आता तो अपलोड करण्यात आला आहे.” मेटाने या निवेदनात कोणत्याही सरकारी आदेशाचा किंवा कायदेशीर निर्देशाचा उल्लेख केलेला नाही.

मोदी यांचा सेल्फीमेडमध्ये शूट केलेल्या व्हिडिओ खूप जास्त चर्चाही रंगली. हा व्हिडिओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता. मेटाच्या (फेसबुक आणि इन्स्टाग्राम) ‘पब्लिक पॉलिसी’ विभागाच्या जागतिक प्रमुखांना ‘मीटी’ने (MeitY) समन्स बजावले.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...