महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार मजबुतीने उभं : छगन भुजबळ

| Updated on: Feb 07, 2021 | 4:20 PM

ज्यावेळी जनता सरकारला स्विकारते, तेव्हा कोणी हात लावू शकत नाही," असे भुजबळांनी स्पष्ट केले. (Chhagan Bhujbal Criticism BJP Leader)

महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार मजबुतीने उभं : छगन भुजबळ
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
Follow us on

नाशिक : “कोणी चाणक्य बिणक्य महाराष्ट्रातील भूमीत चालणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबुतीने उभे आहे. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून सुद्धा काही झाले नाही,” अशी प्रतिक्रिया अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. नाशिकमधील येवला मतदारसंघात नवीन बांधण्यात आलेल्या तालुका पोलीस प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी छगन भुजबळ आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ही प्रतिक्रिया दिली. (Chhagan Bhujbal Criticism BJP Leader)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज कोकणात दौरा आहे. यापूर्वी खासदार नारायण राणे यांनी अमित शहा यांच्या पायगुणामुळे सरकार जाईल. भाजपाचे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर भुजबळांनी “कोणी चाणक्य बिणक्या महाराष्ट्रातील भूमीत चालणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने हे सरकार स्वीकारले आहे. ज्यावेळी जनता सरकारला स्विकारते, तेव्हा कोणी हात लावू शकत नाही,” असे भुजबळांनी स्पष्ट केले.

“अगोदर सरकार पाडून तर दाखवा”

राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवण्यासाठी शिडीची गरज भासणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना “अगोदर सरकार पाडून तर दाखवा, मग शिडी लावायची कि शिडी बॉम लावायचा हे नंतर ठरवू,” असा टोला भुजबळांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अदानींची भेट घेतली होती. यावर भुजबळांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले. “पवार साहेबांना सगळेच लोक भेटत असतात. फडणवीसांच्या काळातील वीज थकबाकी ही 50 हजार कोटींच्या घरात आहे. जर वीज बिल भरले नाही तर वीज वितरण कंपनी बुडाल्याशिवाय राहणार नाही आणि बाकीच्या लोकांना हे हवे आहे. जेवढे अडचणीत येईल तेवढे बघायला अदानी आणि अंबानी आहेतच,” अशा टोला भुजबळ यांनी लगावला

दरम्यान येत्या 27 फेब्रुवारीला होणाऱ्या ओबीसी मोर्चासाठी नाना पटोले, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे यांनाही आमंत्रण दिले आहे, असेही भुजबळ म्हणाले.  (Chhagan Bhujbal Criticism BJP Leader)

संबंधित बातम्या : 

मी बंदखोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे ढळढळीत खोटं बोलले : अमित शाह

उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं; राणेंची जोरदार बॅटिंग