भात लावणीसाठी राज्यमंत्री बाळा भेगडे थेट शेतात

| Updated on: Jul 04, 2019 | 6:53 PM

मावळमध्ये मुसळधार पावसानंतर उघडीप मिळाली. सध्या भात लावणी सुरु झाली आहे. राज्यमंत्री बाळा भेगडेही भात लावणीसाठी थेट शेतामध्ये दाखल झाले आणि त्यांनी शेतकऱ्यांसोबत भात लावणी केली.  

भात लावणीसाठी राज्यमंत्री बाळा भेगडे थेट शेतात
Follow us on

पुणे : मंत्रिपद मिळालं असलं तरी मावळचे भाजप आमदार बाळा भेगडे यांचं मन मतदारसंघातील लोकांमध्ये रमत असल्याचं दिसतंय. मावळमध्ये मुसळधार पावसानंतर उघडीप मिळाली. सध्या भात लावणी सुरु झाली आहे. राज्यमंत्री बाळा भेगडेही भात लावणीसाठी थेट शेतामध्ये दाखल झाले आणि त्यांनी शेतकऱ्यांसोबत भात लावणी केली.

मावळमधील मुख्य पीक हे भात आहे. उशिरा पाऊस आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. गेल्या चार दिवसात मोठा पाऊस झाला आणि शेतकऱ्यांची भात लावणीसाठी घाई सुरु झाली. नवनियुक्त मंत्री बाळा भेगडे यांनीही शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी थेट शेतात जायचं ठरवलं आणि भात लावणी केली. मावळमधील वडगावजवळ एका शेतात त्यांनी ही लावणी केली. यामुळे शेतकरीही आनंदीत झाले होते.

मावळ आणि पुण्यात बाळा भेगडे हे भाजपचा मोठा चेहरा आहेत. 1994 पासूनच त्यांनी भाजपा युवा मोर्चाचं काम करत अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. यानंतर ते आता दुसऱ्यांदा आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी राज्यमंत्रिपद देण्यात आलंय. सध्या ते पुणे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यात लढत होती. या लढतीमध्ये युतीच्या विजयात बाळा भेगडेंनीही महत्त्वाचा वाटा उचलला होता.