Vijay Wadettivar on Congress Upset | थोरात-चव्हाण-राऊत यांच्यानंतर विजय वडेट्टीवारांकडूनही नाराजी व्यक्त

| Updated on: Jun 17, 2020 | 5:19 PM

तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे सत्तेत समान वाटा मिळावा, समान न्याय व्हावा ही पक्षातील आमदार आणि नेत्यांची इच्छा असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. (Vijay Wadettivar expects CM to include Congress in Decision Making)

Vijay Wadettivar on Congress Upset | थोरात-चव्हाण-राऊत यांच्यानंतर विजय वडेट्टीवारांकडूनही नाराजी व्यक्त
Follow us on

मुंबई : तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे सत्तेत समान वाटा मिळावा, कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर काँग्रेसलाही विचारात घ्यावे, अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत यांच्यानंतर वडेट्टीवारांनीही आपली नाराजी व्यक्त केली. (Vijay Wadettivar expects CM to include Congress in Decision Making)

काही निर्णय होत असताना काँग्रेसला विचारात घेतलं जात नव्हतं. विचारात घेतलं जावं, एवढीच आमची मागणी होती. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे सत्तेत समान वाटा मिळावा, समान न्याय व्हावा ही पक्षातील आमदार आणि नेत्यांची इच्छा असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे कोणताही निर्णय घेताना काँग्रेसला विचारावे, आमचं महाविकास आघाडी सरकार लोकहिताची कामं करत आहे, कोरोना संकटात लोकांना मदत करत आहे, कोणी कितीही आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न केला तरीही काही होणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

हेही वाचा : खाटेचे कुरकुरणे समजून घ्या, पूर्ण माहिती घेऊन पुन्हा अग्रलेख लिहा, बाळासाहेब थोरातांचे ‘सामना’ला उत्तर

कोकणात 25% विद्युत पुरवठा सुरु झाला आहे. पुढच्या दहा दिवसात पूर्ण विद्युत पुरवठा सुरळीत होईल. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्याठिकाणी भूमिगत केबल टाकून वीजपुरवठा सुरळीत करावा असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

रोजगार हमी योजनेतून त्या ठिकाणी काम सुरु आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळाने ज्या शाळांचे नुकसान झाले आहे त्या कोकणातील शाळांसाठी 24 कोटी रुपयांचा निधी देण्याचा आज निर्णय झाला. विनाअनुदानित शाळांनाही शासकीय शाळांप्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

फळबागांमध्ये सुपारी येत नव्हती. आता फळबागांमध्ये सुपारीचाही समावेश करण्यात आला आहे, असं वडेट्टीवार यांनी नमूद केलं. (Vijay Wadettivar expects CM to include Congress in Decision Making)

हेही वाचा : आधी थोरात, मग अशोक चव्हाण, आता नितीन राऊतांकडून नाराजी व्यक्त

घराचं 25 टक्के नुकसान झालं असेल, त्यांना पंचवीस हजार रुपये आणि कपडे व साहित्यासाठी दहा हजार असे एकूण 35 हजार मिळणार आहेत. ज्या घरांचं 50 टक्के नुकसान झालं आहे, त्यांना पन्नास हजार आणि कपडे व साहित्यासाठी दहा हजार असे साठ हजार मिळणार आहेत. तर जी घरं पूर्णपणे पडली आहेत, त्यांना दीड लाख रुपये मिळणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.