भाजपने माणसातला देव ओळखला नाही, ‘मंदिरं उघडा’ आंदोलनावरुन विजय वडेट्टीवारांची टीका

| Updated on: Aug 29, 2020 | 6:51 PM

भाजपच्या 'मंदिरं उघडा' आंदोलनावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. भाजपच्या हृदयात देव नसल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावला.

भाजपने माणसातला देव ओळखला नाही, मंदिरं उघडा आंदोलनावरुन विजय वडेट्टीवारांची टीका
Follow us on

चंद्रपूर : कोरोनाचं संकट वाढत असताना मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन (Vijay Wadettiwar Criticize BJP), म्हणजे राजकीय फायद्याचे प्रयत्न असल्याची टीका राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केली आहे (Vijay Wadettiwar Criticize BJP).

भाजपच्या ‘मंदिरं उघडा’ आंदोलनावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. भाजपच्या हृदयात देव नसल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावला. संकटकाळात सेवा हाच देव हे भाजप विसरल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. “संकट वाढत असताना मंदिरं आंदोलन म्हणजे राजकीय फायद्याचे प्रयत्न आहे. हिंदूमुळे भाजप वाचली आहे. नाहीतर त्यांची गती होईल”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. भाजपने दुर्दैवाने माणसातला देव ओळखला नसल्याचंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

भाजपचं घंटा नाद आंदोलन

कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि मंदिरं बंद करण्यात आली आहेत. मात्र, केंद्रसरकारने घोषित केलेल्या अनलॉकनुसार धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांत मंदिरे उघडण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्रात अजूनही धार्मिक स्थळे बंद आहेत. धार्मिक स्थळं अनलॉक प्रक्रियेत उघडी करावी, यासाठी भाजपने आज राज्यभर ‘उद्धवा उघड दार’ हे आंदोलन केले (Vijay Wadettiwar Criticize BJP).

भाजपने आंदोलनामुळे देवाचाही बाजार मांडला – विजय वडेट्टीवार

“महाराष्ट्र संतांची भूमी असून माणूस रुपी देवावर संकट कोसळले असताना भाजप मंदिरासाठी आंदोलन करत आहेत”, असा घणाघात वडेट्टीवारांनी केली. भाजपने या आंदोलनामुळे देवाचाही बाजार मांडला असून राजकीय फायद्यासाठी ही केले जात असल्याचं, वडेट्टीवार म्हणाले. भाजपमुळे हिंदू अस्तित्व आहे, यापेक्षा हिंदुमुळे भाजप टिकली आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. अडचणीच्या काळात लोकसेवेसाठी तत्पर राहणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने दुर्दैवाने माणूस ओळखला नसल्याची टीका वडेट्टीवारांनी केली.

Vijay Wadettiwar Criticize BJP

संबंधित बातम्या :

जो उत्साह दारु दुकाने उघडताना दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा : देवेंद्र फडणवीस