AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारनेच ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा खून केला, आशिष शेलारांचा हल्लाबोल

ठाकरे सरकारने काय केले तर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा, जनगणननेची आकडेवारी केंद्र सरकारने द्यावी, साथीच्या काळात आम्हाला इंपेरिकल डाटा गोळा करणे शक्य नाही, असं वारंवार सांगत राहिले, अशी खोचक टीका शेलार यांनी केलीय.

ठाकरे सरकारनेच ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा खून केला, आशिष शेलारांचा हल्लाबोल
आशिष शेलार, आमदार, भाजप
| Edited By: sagar joshi | Updated on: Dec 16, 2021 | 6:37 PM
Share

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्ले सुरु झालेत. ‘ठाकरे सरकारने दृष्टीआहिन, बुध्दीाहिन आणि दिशाहिन भूमिकेने ओबींसींच्या राजकीय आरक्षणाचा खून केला’, असा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. तसंच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण जात असताना मंत्री म्हणून छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार मंत्रीमंडळात कसे राहू शकतात?, असा खोचक सवालही शेलार यांनी केलाय.

ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळे स्थाानिक स्वाराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27 टक्केच आरक्षणाचा खून झाला. ज्या पद्धतीने 2019ला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवडा देताना ट्रिपल टेस्टमध्ये खरा ठरणारा इंपेरिकल डाटा गोळा करा, असा आदेश दिला होता. मात्र, अहंकार आणि हेकेखोरपणा या सरकारने सोडला नाही. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला सांगितले की, मागासवर्ग आयोग नेमा, इंपेरिकल डाटा गोळा करा, आरक्षणासाठी समथर्न कार्यपध्दीती करा. पण ठाकरे सरकारने काय केले तर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा, जनगणननेची आकडेवारी केंद्र सरकारने द्यावी, साथीच्या काळात आम्हाला इंपेरिकल डाटा गोळा करणे शक्य नाही, असं वारंवार सांगत राहिले, अशी खोचक टीका शेलार यांनी केलीय.

‘आंब्याच्या झाडासमोर उभे राहुन चिंच मागण्याचं काम’

ओबीसी समाजाचे मागासलेपण सिध्द करणारी इंपेरिकल डाटा आणि जनगणनेची आकडेवारी यामध्ये फरक आहे. पण आंब्याच्या झाडासमोर उभे राहुन चिंच द्या, अशी मागणी करण्यारसारखं काम या सरकारनं केलं. छगन भुजबळ, विजय वड्डेट्टीवार, नाना पटोले यांनी एवढे दिवस हेच केलं. स्वत:चा नाकर्तेपणा दुसऱ्यावर आरोप करून झाकला जात नाही, असा टोलाही शेलार यांनी लगवाला आहे.

करण जोहरच्या ‘त्या’ पार्टीत सरकारचा मंत्री होता का?

बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर यांच्या पार्टीत काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. करण जोहरच्या पार्टीत ठाकरे सरकारचा कोणी मंत्री होता का? असेल तर त्यांनी पुढे यावे. लोकांच्या आरोग्याशी खेळू नये, अशी शंका आशिष शेलार यांनी उपस्थित केली आहे.

करण जोहरच्या पार्टीवरून संभ्रमाचे वातावरण दिसते निर्माण झाले आहे. या पार्टीत राज्‍य शासनातील कोणी मंत्री होता का?, हा संशय बळावयाचे नसेल तर त्‍या इमातीचे सीसीटीव्‍ही फुटेज जाहीर करावे. जी माहिती समोर आली त्‍यामध्‍ये त्‍या पार्टीमधील अन्‍य लोकांनी पालिकेकडून टेस्‍ट केलेल्‍या नाहीत. त्‍यांनी हरकिशनदास रूग्‍णालयात चाचण्‍या केल्‍या आहेत, असं सांगतानाच या पार्टीत किती लोक होती?, अशी शंका निर्माण होत आहे. त्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कुणी मंत्री होता का? पालिकेने सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे. जर कुणी मंत्री असेल तर त्याने पुढे यावे. कुणी मंत्री त्या पार्टीला होतं का त्याची स्पष्टता असावी, जन आरोग्‍याची खेळू नये, असे शेलार यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या :

Breaking : नेमबाज कोनिका लायकचा गूढ मृत्यू! लग्नाची सुरु होती तयारी; अभिनेता सोनु सूदने गिफ्ट केली होती रायफल

OBC Reservation : ओबीसींच्या जागा खुल्या प्रवर्गात टाकून जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका?

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना