मुख्यमंत्र्यांच्या ‘नटसम्राट’ला नितेश राणेंचं ‘कॉमेडी सम्राट’ने प्रत्युत्तर

सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणशैलीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना उपहासाने नटसम्राट ही उपमा दिली. त्यावरुन आता जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या 'नटसम्राट'ला नितेश राणेंचं 'कॉमेडी सम्राट'ने प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे आणि नितेश राणे
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 6:59 PM

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणशैलीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना उपहासाने नटसम्राट ही उपमा दिली. त्यावरुन आता जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘नटसम्राट’ला भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘कॉमेडी सम्राट’ असं प्रत्युत्तर दिलं आहे.(Nitesh Rane’s reply to CM Uddhav Thackeray’s speech in the Assembly)

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास झाल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान नटसम्राटमधील मी अथ्थेलो, मी आहे हॅम्लेट असा भास झाला. पण शेवटी कुणी किंमत देतं का किंमत अशी स्थिती असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. मुनगंटीवार यांच्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भीती वाटत होती, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. त्याचबरोबर मी आणि मुनगंटीवार हाडाचे कलाकार आहोत. पण कलेला राजकारणात वाव नाही. मात्र, मुनगंटीवार यांना संधी मिळाली की त्यांची कला उफाळून येते. पण सुधीरभाऊ तुमच्यातला कलाकार मारु नका, अशा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना दिला आहे.

‘कुणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री!’

आज एक कॉमेडी सम्राट विधानसभेत पाहिला आणि ऐकला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही! “कुणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री?”, अशा शब्दात नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभागृहातील भाषणाची खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोललेच नाहीत, असंही राणे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर फडणवीसांचाही हल्लाबोल

धन्यवाद प्रस्तावात जी चर्चा झाली, त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते. पूर्ण तासभर ते बोलले. पण या तासाभरात ते महाराष्ट्रात येऊच शकले नाहीत. ते चीनमध्ये गेले, पाकिस्तानात गेले, पंजाबला गेले, यूपीत गेले, ते महाराष्ट्रात येऊच शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांना आता खूप दिवस झाले, पूर्वी ते नवे होते. चौकातलं भाषण आणि सभागृहातील भाषण यातील अंतर त्यांना अजून समजलेलं नाही. सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यावर बोलावं लागतं. राज्यातील प्रश्नावर बोलावं लागतं. दुर्दैवाने शेतकऱ्यांबाबत ते एक मदुद्दाही बोलले नाहीत. बोंडअळी, खोडकिडी, वीजतोडणीबद्दल बोलले नाहीत, साडेतीन लाख शेतकऱ्यांची वीज तोडली त्यांची काळजी नाही, मुख्यमंत्र्यांना दिल्ली बॉर्डरवरील सिंघू बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जाते त्याची चिंता.. हे जे उत्तर होतं त्याला भ्रमनिरास हा शब्द छोटासा असल्याची घणाघाटी टीका फडणवीसांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

फडणवीस म्हणाले, शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी सोडणार नाही, उद्धव म्हणाले, मग कधी जाताय?

मुख्यमंत्र्यांकडून ‘निर्लज्ज’ शब्दाचा वापर, मुनगंटीवारांची हरकत, जाधवांचं उत्तर; गोंधळ, घोषणाबाजी आणि काय काय? वाचा सविस्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेत दमदार भाषण, वाचा 10 महत्त्वाचे आणि मोठे मुद्दे

Nitesh Rane’s reply to CM Uddhav Thackeray’s speech in the Assembly

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.