AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सरकार अडचणीत, गेल्या 10 महिन्यांपासून…शिंदेंच्या विश्वासू नेत्याच्या विधानानं खळबळ!

आमदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठीचा निधी तसेच मंत्र्‍यांना त्यांच्या खात्याला मिळणारा निधी या दोन मुद्द्यांवरून तर महायुतीतल्याच नेत्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. असे असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते तथा आमदार संजय गायकवाड यांनी मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक मानले जातात.

मोठी बातमी! सरकार अडचणीत, गेल्या 10 महिन्यांपासून...शिंदेंच्या विश्वासू नेत्याच्या विधानानं खळबळ!
| Updated on: Aug 12, 2025 | 4:39 PM
Share

Sanjay Gaikwad : राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. महायुतीच्या रुपात भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष सध्या सत्तेत आहेत. मात्र सत्तेत एकत्र असले तरी वेगवेगळ्या कारणांमुळे या तिन्ही पक्षांत नाराजीनाट्य रंगत आलेले आहे. विशेष म्हणजे आमदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठीचा निधी तसेच मंत्र्‍यांना त्यांच्या खात्याला मिळणारा निधी या दोन मुद्द्यांवरून तर महायुतीतल्याच नेत्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. असे असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते तथा आमदार संजय गायकवाड यांनी मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक मानले जातात.

संजय गायकवाड यांनी केलाय खळबळजनक दावा

गेल्या दहा महिन्यांपासून सर्वच आमदारांना कोणताही निधी मिळत नाहीये. काही लोकप्रिय योजनांमुळे राज्य सरकार सध्या अडचणींतून चालले आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय की लवकरच आपली परिस्थिती सुधारेल आणि राज्याचीही परिस्थिती पुर्ववत होईल, अशी कबुलीच संजय गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

प्रताप सरनाईक यांनी गायकवाडांचा दावा फेटाळला

तर संजय गायकवाड यांच्या याच प्रतिक्रियेवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय गायकवाड यांचा दावा फेटाळला आहे. सर्वच आमदारांना निधी दिला जात आहे. माझ्या विभागाचे मला विचाराल तर एसटी डेपो, एसटी स्टँड किंवा इतरही काही गोष्टींसाठी निधीची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे आमदारांनी संबंधित वक्तव्यक केलेलं असलं ती माझ्यातरी निधीची टंचाई निदर्शनास आलेली नाही, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.

फडणवीस, शिंदे नेमकी काय भूमिका घेणार?

दरम्यान, संजय गायकवाड यांनी याआधीही बरीच वादग्रस्त विधानं केलेली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच आमदारांनी जपून बोलावे, असाही सल्ला दिला होता. त्यानंतर आता गायकवाड यांनी आमदारांना 10 महिन्यांपासून निधी मिळाला नसल्याचा दावा केल्यामुळे एकनाथ शिंदे तसेच फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...