AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवेंद्रराजेंनी उमेदवारी अर्जच भरला नाही, अजित पवारांच्या दौऱ्याकडेही पाठ

साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra raje bhosale) यांनी मुलाखतीला दांडी मारल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जिल्ह्यात असताना शिवेंद्रराजे (MLA Shivendra raje bhosale) यांनी पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेलाही उधाण आलंय.

शिवेंद्रराजेंनी उमेदवारी अर्जच भरला नाही, अजित पवारांच्या दौऱ्याकडेही पाठ
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 25, 2019 | 7:25 PM
Share

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेनेत जाण्याने मोठी खिंडार पडली आहे. त्यातच आता इतर काही आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra raje bhosale) यांनी मुलाखतीला दांडी मारल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जिल्ह्यात असताना शिवेंद्रराजे (MLA Shivendra raje bhosale) यांनी पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेलाही उधाण आलंय.

शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडे विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल न केलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वर्तुळात संदिग्धता वाढली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सातार्‍याच्या दौर्‍यावर अजित पवार आले असताना शिवेंद्रराजे या मुलाखतीला अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यात अधिक लक्ष दिलंय. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी भवनामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. ही प्रक्रिया अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.

राष्ट्रवादीने जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवले होते. त्यानुसार 13 इच्छुकांनी ऑफलाईन, तर काही इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. त्यामध्ये पक्षाच्या विद्यमान आमदारांपैकी केवळ शिवेंद्रराजे भोसले यांचाच अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे सातारा, जावलीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही बुचकळ्यात पडले आहेत.

शिवेंद्रराजे यांनी भाजपमधून लढण्याबाबतही काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता, तरीही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. तिच भूमिका शिवेंद्रराजेंनी घेतली तर काय चुकले? असा सूर शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांचा उमटत आहे. मात्र अजित दादांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रशनावर त्यांनी स्वत:हा मुलाखत फॉर्म भरला नसल्याचं सांगून याचा चुकीचा अर्थ घेऊ नये असं ते म्हणाले.

राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवेंद्रराजेंच्या सातारा – जावळी मतदारसंघात निवडणूक लढवण्याची भाषा करणार्‍यांबाबत (शशिकांत शिंदे) पक्ष दखल घेत नाही. शिवेंद्रराजे भोसले यांचे बंधू उदयनराजे भोसले हे देखील त्यांच्या विरोधात काम करत आहेत. शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष प्रवेशाबाबत शिवेंद्रराजेंकडे जोर लावलाय. मात्र शिवेंद्रराजेंनी याबाबत बोलण्यास नकार दिलाय.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या