Raj Thackeray Meet Bhagat Singh Koshiyari | वाढीव वीजबिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा, वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांनाही भेटेन : राज ठाकरे

| Updated on: Oct 29, 2020 | 11:27 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. (Raj Thackeray Meet Governor Bhagat Singh Koshiyari Live Update)

Raj Thackeray Meet Bhagat Singh Koshiyari | वाढीव वीजबिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा, वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांनाही भेटेन : राज ठाकरे
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (29 ऑक्टोबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपाल कोश्यारी यांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे ही सकाळी 10.30 वाजता ही भेट झाली. या भेटीत वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा झाली. “मी वीज बिलाबाबत राज्यपालांशी भेटलो. याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा. जर वेळ पडली तर मी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटणार असल्याचे राज ठाकरे यांनी या भेटीनंतर सांगितले.” (Raj Thackeray Meet Governor Bhagat Singh Koshiyari Live Update)

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

“विषय होता लोकांना येत असलेल्या वीजबिलाबाबत, या वीजबिलाबाबत मनसेने प्रत्येक ठिकाणी आंदोलनं केली, अदानीसह अनेकजण भेटून गेले, ते म्हणाले MERC ने आम्हाला मान्यता द्यावी. आमचं शिष्टमंडळ MERC ला भेटले. त्यांचं लेखी पत्र आमच्याकडे आहे. MERC चं म्हणणं आहे कंपन्या आहेत त्या वीजबिलासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. म्हणजे एका बाजूला MERC कडे बोट दाखवते, कंपन्या MERC कडे दाखवतात.”

“ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं, हा विषय आम्ही लवकरात लवकर निर्णय करु.. राज्यपालांशी बोलल्यावर ते म्हणाले पवारसाहेबांशी बोलून घ्या.. आम्ही बोलू त्यांच्याशी,” असे राज ठाकरे म्हणाले.

“मात्र हा प्रश्न राज्य सरकारलाही माहिती आहे.. जिथे दोन हजार बिल येत होतं, तिथे दहा दहा हजार बिल येत आहे. जिथे ५ हजार येत होतं, तिथे २५ हजार येत आहे. मग हे राज्य सरकारला जर हे माहिती आहे, तर कशामध्ये हे प्रकरण अडकलंय ते माहिती नाही. त्यामुळे याचा निर्णय राज्य सरकारने तात्काळ घेतला पाहिजे, याचे पहिले निवेदन राज्यपालांना दिले आहे.”

“मी याबाबत शरद पवारांशी बोलेन, जर वेळ पडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटेन. पण हा विषय त्यांना माहिती आहे. त्यांना काहीही सांगितलं तरी  ते काम चालू आहे, असचं ते सांगतात. पण काम चालू असलं तर त्यावर निर्णय होत नाही. अनेकांचे रोजगार गेले आहेत.”

“लवकरात लवकर यावर निर्णय व्हावा, गेले सात आठ महिने लोकांकडे रोजगार नाही. काम नाही. पैसे नाही. त्यात तुमची बिलं ही पाचपट सहापट येत आहे. ती कुठून लोकं भरणार आहेत. जर भरली नाही तर वीज कापली जाणार वैगरे. एका निर्णयासाठी एवढे दिवस लागत असतील तर त्याला काय अर्थ आहे. लोकांची भावना बघता सरकारने एक-दोन दिवसात याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती आहे.”

“पुढे त्याविषयी मी सरकारशी बोलेन. पण सध्या सरकारचं आणि राज्यपालांचं फारच सख्य असल्याने पुढे हा विषय किती जाईल मला याची कल्पना नाही. पण राज्यपाल हे राज्याचे प्रमुख म्हणून सरकारसमोर हा विषय मांडतील. अशी अपेक्षा आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.

? LIVE UPDATE ?

[svt-event title=”राज ठाकरेंची राज्यपालांशी वीज बिलासंदर्भात चर्चा, वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटणार” date=”29/10/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ]

(Raj Thackeray Meet Governor Bhagat Singh Koshiyari Live Update)

[svt-event title=”राज ठाकरे राजभवनात दाखल” date=”29/10/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी दाखल, 12 गाड्यांचा ताफा राजभवनात दाखल [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरेंसोबत हे पदाधिकारी राजभवनावर” date=”29/10/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंतर , शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता हे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे राज्यपालांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवरुन रवाना” date=”29/10/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे हे राज्यपालांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवरुन रवाना झाले आहेत. राज ठाकरेंसह अमित ठाकरेही राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना, त्यापाठोपाठ मनसेच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या, राज ठाकरे यांचा ताफा राजभवनाकडे रवाना [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे मायक्रोफायनान्स कंपन्यांसह मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता” date=”29/10/2020,9:42AM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे मंदिर उघडण्यासह, मायक्रोफायनान्स कंपन्यांचा मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”राज्यपालांच्या भेटीआधी राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक” date=”29/10/2020,9:15AM” class=”svt-cd-green” ] राज्यपालांच्या भेटीआधी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, शिरीष सावंत, रिटा गुप्ता यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. राज्यपाल भेटीपूर्वी सकाळी 9 वाजता काही ठराविक पदाधिकाऱ्यांना कृष्णकुंजवर बैठकीसाठी दाखल. [/svt-event]

  • राज्यपाल भेटीपूर्वी सकाळी 9 वाजता काही ठराविक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा
  • मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, शिरीष सावंत, रिटा गुप्ता यांसह इतर पदाधिकारी कृष्णकुंजवर दाखल
  • राज्यपालांच्या भेटीआधी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
  • राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला, राजभवनावर खलबतं

राज्यपालांच्या भेटीपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

राज्यपालांच्या भेटीआधी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, शिरीष सावंत, रिटा गुप्ता यांसह इतर पदाधिकारी कृष्णकुंजवर दाखल झाले आहे. राज्यपाल भेटीपूर्वी सकाळी 9 वाजता काही ठराविक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बैठकीसाठी बोलवले होते. (Raj Thackeray Meet Governor Bhagat Singh Koshiyari Live Update)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध संघटना, कर्मचारी आणि नागरिकांची शिष्टमंडळे सातत्याने कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेताना दिसत होती. यापैकी काही प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा करुन सोडवले होते. तर काही समस्यांसाठी राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, आता राज ठाकरे थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Raj Thackeray Meet Governor Bhagat Singh Koshiyari Live Update)

संबंधित बातम्या : 

राज ठाकरे मैदानात, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या भेटीची वेळ ठरली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार, भेटीचा विषय मात्र अद्याप अस्पष्ट