मनसेचा मेगाप्लॅन, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा ठरला, निवडणुकीसाठी रणनीती आखली

| Updated on: Jan 29, 2021 | 1:26 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्याला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

मनसेचा मेगाप्लॅन, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा ठरला, निवडणुकीसाठी रणनीती आखली
राज ठाकरे
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे. (MNS Chief Raj Thackeray will visit Ayodhya to visit ram temple during 1 to 9 March )

मराठी भाषा दिनाला मराठी स्वाक्षरी मोहीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वरिष्ठ मंडळी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाणार आहेत. त्याचा अहवाल राज ठाकरे यांना देतील. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा मराठा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण, उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जाईल. त्या दिवशी मराठी स्वाक्षरी मोहिम सुरु करण्यात येईल. राज ठाकरे मुंबई आणि ठाणेमध्ये सही करण्यासाठी जातील. मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू यांचा सन्मान मनसे करणार आहे. मराठी वृत्तपत्रे आणि मराठी वृत्तवाहिन्या, नाट्य कलावंत आणि सिनेकलावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

मनसेची सदस्य नोंदणी

9 मार्चच्या पक्षाच्या वर्धापन दिनाला राज ठाकरे संबोधन करतात. यंदा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिलपर्यंत आपण मनसे सदस्य नोंदणी करणार आहोत. त्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणून ओळखपत्र देण्यात येईल. गटाध्यक्षांना नव नाव राजदूत देण्यात येणार त्यांना बिल्ला देण्यात येईल. राजकारणापलीकडच्या सुशिक्षित लोकांनी सूचना कळवाव्यात, त्यांच्या कल्पनांचा शहरांच्या विकासासाठी स्वत:हून काम करणाऱ्या लोकांना राज ठाकरेंच्या स्वाक्षरीचं पत्र दिलं जाईल, असं नांदगावकर म्हणाले.

आगामी महापालिका निवडणुका आणि पक्ष वाढीसाठी नवनवीन संकल्पना यावर मनसेच्या बैठकीत चर्चा झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर , अविनाश अभयंकर , गजानन काळे , विविध नेते उपस्थित होते. मनसेची राज्यस्तरीय कोअर कमिटी तयार करुन, निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे. सर्व महापालिका स्तरावर ही एक कमिटी असेल. या कमिट्यांकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असेल.

संबंधित बातम्या:

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी-शाहांवर घणाघात, आता शेतकरी आंदोलनावर राज ठाकरे काय बोलणार? 

पुण्यात मनसेची मोर्चेबांधणी, राज ठाकरेंचा दोन दिवस पुणे दौरा

MNS meeting Live : मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंची सूनही उपस्थित, मितालीने लक्ष वेधले

(MNS Chief Raj Thackeray will visit Ayodhya to visit ram temple during 1 to 9 March )