दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर, वारीस पठाणांना मनसेचा इशारा!

| Updated on: Feb 20, 2020 | 6:20 PM

एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण (Waris Pathan Hindu Muslim) हे हिंदू-मुस्लिमांबाबत वक्तव्य करुन वादात सापडले आहेत.

दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर, वारीस पठाणांना मनसेचा इशारा!
Follow us on

मुंबई : एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण (Waris Pathan Hindu Muslim) हे हिंदू-मुस्लिमांबाबत वक्तव्य करुन वादात सापडले आहेत. आम्ही 15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी पडू, असं विधान वारीस पठाण (Waris Pathan Hindu Muslim) यांनी केलं आहे. कर्नाटकातील गुलबर्गा इथं चिथावणीखोर वक्तव्य करुनही वारीस पठाण यांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही असं म्हटलं आहे. वारीस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर मनसेने त्यांना रोखठोक इशारा दिला आहे.

“दगडाचं उत्तर दगडाने, तलवारीचं उत्तर तलवारीने, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे, तसंच उत्तर दिलं जाईल”, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

याशिवाय मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरही ट्विट करुन वारीस पठाण यांना थेट इशारा दिला आहे. “आम्ही…’ ‘तुम्ही…’ असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण…. ‘आम्ही’ इतके, ‘तुम्ही’ तितके… अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना ‘आम्ही’ इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल!” , असं मनसेने ट्विट केलं आहे.

वारीस पठाण काय म्हणाले?

कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात वादग्रस्त विधानं केलं. “आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना. इट का जवाब पत्थर से’ हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या”, असं चिथावणीखोर वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं.

वारीस पठाण यांचं स्पष्टीकरण

हे आमचे हिंदू भाई बहन आहेत. माफी मागायचा काही विषय येत नाही. भडकवण्याची भाषा भाजपचे नेते करतात. मी हमेशा असं बोलत आलोय, असं वारीस पठाण म्हणाले.