“छत्रपतींना व्यथित होताना पाहणं वेदनादायक, महाराजांचं नाव वापरण्याची शिवसेनेची लायकी नाही”- गजानन काळे

संभाजी राजे यांची राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणं अनेकांच्या जिव्हारी लागलंय. गजानन काळे यांनी संभाजी राजेंच्या या निर्णयावर ट्विटरच्या माध्यमातून भाष्य केलंय. छत्रपतींना असं व्यथित होताना पाहणं वेदनादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय.

छत्रपतींना व्यथित होताना पाहणं वेदनादायक, महाराजांचं नाव वापरण्याची शिवसेनेची लायकी नाही- गजानन काळे
आयेशा सय्यद

|

May 27, 2022 | 1:06 PM

मुंबई : संभाजी राजे छत्रपती यांनी काही वेळा पूर्वी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. “छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणं वेदनादायक होतं.उठता बसता महाराजांचं नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायची लायकी नाही असंच म्हणावं लागेल. बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत”, असं गजानन काळे म्हणाले आहेत.

संभाजी राजे यांची राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणं अनेकांच्या जिव्हारी लागलंय. गजानन काळे यांनी संभाजी राजेंच्या या निर्णयावर ट्विटरच्या माध्यमातून भाष्य केलंय. छत्रपतींना असं व्यथित होताना पाहणं वेदनादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय. संभाजी राजेंबाबत बोलताना त्यांनी शिवसेनेलाही लक्ष केलं. “उठता बसता महाराजांचं नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायची लायकी नाही असंच म्हणावं लागेल. बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत”, असं गजानन काळे म्हणालेत.

गजानन काळे यांनी आणखी एक ट्विट केलंय. शिवसेनेचा ‘खोटीसेना’ असा त्यांनी उल्लेख केलं आहे. “चोरसेना आता खोटीसेना म्हणून प्रसिद्ध होण्याच्या बेतात. भावाबद्दल कूटनिती करणाऱ्यांकडून राजेंना फसवले म्हणून काय आश्चर्य वाटून घ्यायचे? महाराष्ट्र आणि मराठा समाजाने ही जखम विसरता कामा नये. हिम्मत असेल तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ येवून सांगा की आम्ही राजेना शब्द दिला नव्हता”, असं गजानन काळे म्हणाले आहेत.

संभाजी राजे यांची निवडणुकीतून माघार

राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलंय. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी मी हा हा निर्णय घेतला असल्याचं संभारीज राजे यांनी म्हटलंय. मी राज्यसभा निवडणूक लढवत नसलो, तरी ही माघार नाही आहे, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला खडसावलं आहे. माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे. कुणापुढे झुकून मला राज्यसभेची खासदारकी नको आहे, असंही ते म्हणालेत. तसंच सर्वपक्षीयांची मदत मला अपेक्षित होती, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें