राज ठाकरेंनंतर मनसेच्या नेत्यांचा नाशिक दौरा, कोणते नेते सहभागी, काय निर्णय होणार?

| Updated on: Aug 26, 2021 | 9:40 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच नाशिकचा दौरा करुन महत्त्वाच्या नेत्यांसोबत आगामी काळातील पक्षाची रणनीती ठरवली. यानंतर आता उद्यापासून (27 ऑगस्ट) मनसेचे इतर नेते नाशिक दौऱ्यावर जात आहेत.

राज ठाकरेंनंतर मनसेच्या नेत्यांचा नाशिक दौरा, कोणते नेते सहभागी, काय निर्णय होणार?
मनसे
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच नाशिकचा दौरा करुन महत्त्वाच्या नेत्यांसोबत आगामी काळातील पक्षाची रणनीती ठरवली. यानंतर आता उद्यापासून (27 ऑगस्ट) मनसेचे इतर नेते नाशिक दौऱ्यावर जात आहेत. नाशिकमधील पक्ष बांधणीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा होत असल्याचं सांगण्यात येतंय. या दौऱ्यात नवीन शाखा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच नाशिक पालिका निवडणूक तयारीचा आढावाही घेतला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे काय रणनीती आखणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, शिरीष सावंत, अमेय खोपकर हे या दौऱ्यात सहभागी असणार आहेत. या दौऱ्याविषयी माहिती देताना संदीप देशपांडे म्हणाले, “एक प्रभाग रचनेला आमचा पाठिंबा आहे. लोक प्रतिनिधी जवळचा आणि मतदाराच्या प्रभागातील असला पाहिजे. आधी एका प्रभागात अनेक सदस्य निवडून आल्यावर नागरिकांमध्ये संभ्रम होत होता.”

मनसेची पहिली मोठी घोषणा; नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार!

दरम्यान, नाशिक महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मनसेने आता आणखी एक मोठी घोषणा केलीय. नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची घोषणा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. त्यामुळे नाशिक पालिका निवडणूक मनसेने अधिक गंभीरपणे घेतल्याचं दिसून येतंय.संदीप देशपांडे यांनी मीडियाशी बोलताना ही मोठी माहिती दिली. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी आम्ही नाशिक महापालिका स्वबळावर लढणार आहोत. महापालिका निवडणुका अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार आहेत, असं स्पष्ट केलंय.

हेही वाचा :

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंना हायकोर्टाने दिलासा, 7 सप्टेंबरपर्यंत कारवाई टळली

परप्रांतीयांचा मुद्द्याला बगल, राज ठाकरेंच्या आदेशाने मनसे नेत्याची ‘हिंद मजदूर सभे’त एन्ट्री

मविआ सरकार आल्यापासून महाराष्ट्राला पणवती, दहीहंडीवरुन मनसेची आक्रमक भूमिका

व्हिडीओ पाहा :

MNS leaders going to Nashik political tour amid Municipal corporation election