शिवसेनेचे खासदार पण म्हणतात भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मत द्यावे; त्यांना विश्वप्रवक्ते काय म्हणणार?, मनसेचा राऊतांवर निशाणा

मनसेने पुन्हा एकदा शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आता यांचे खासदार पण म्हणतायेत आपण भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करायला हवं. मग हे खासदारांसाठी कोणते नवे शद्ब शोधणार अशा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

शिवसेनेचे खासदार पण म्हणतात भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मत द्यावे; त्यांना विश्वप्रवक्ते काय म्हणणार?, मनसेचा राऊतांवर निशाणा
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 06, 2022 | 9:16 AM

मुंबई : मनसेने (MNS) पुन्हा एकदा शिवसेना (shiv sena) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. आता यांचे खासदार पण म्हणतायेत आपण भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करायला हवं. आधी रेडे, प्रेतं, घाण आणि आता सगळे खासदार सोडून गेल्यावर पिता-पुत्र आणि विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा? या विचारात असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे, अशी टीका मनसेचे नेते गजानन काळे यांनी केली आहे. यापूर्वी देखील अनेकदा मनसेकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र ते त्यावेळी जे काही बोलले त्यामुळे जनतेत सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. यावर प्रतिक्रिया देताना राज साहेबांसोबत नेहमीच द्वेषाचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेबाबत एक मनसे सैनिक म्हणून किंचित देखील सहानुभूती वाटत नसल्याचे ट्विट शिवसेना नेते अमेय खोपकर यांनी केले होते.

काय म्हटलंय काळे यांनी?

राज्याच्या राजकारणात गेले काही दिवस मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचे पहायला मिळत आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. जे आमदार शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले त्यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. कामख्या देवीला 40 रेडे पाठवल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र आता शिवसेनेचे खासदार देखील भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करू शकतात अशी चर्चा आहे. यावरून मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.  आता यांचे खासदार पण म्हणतायेत आपण भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करायला हवं. आधी रेडे, प्रेतं, घाण आणि आता सगळे खासदार सोडून गेल्यावर पिता-पुत्र आणि विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा? या विचारात असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

 

खोपकरांची टीका

दरम्यान यापूर्वी अमेय खोपकर यांनी देखील ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेना कायमच राज ठाकरे यांच्यासोबत द्वेषाचे राजकारण करत आली आले. त्यामुळे आपल्याला शिवसेनेबद्दल आणि उद्धव ठाकरेंबाबत किंचितही साहनुभूती नसल्याचे खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.