महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता कृष्णकुंज, संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला टोला

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकासआघाडी सरकारला टोला लगावला आहे. (MNS Sandeep Deshpande On Various delegation Meet Raj Thackeray)

महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता कृष्णकुंज, संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला टोला
sandeep deshpande on cm uddhav thackeray
| Updated on: Nov 16, 2020 | 9:59 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे विविध संघटनांच्या प्रतिनिधी मागण्यांसाठी कृष्णकुंजवर दाखल होत आहे. राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनेकांच्या समस्याही सुटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकासआघाडी सरकारला टोला लगावला आहे. समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे, कृष्णकुंज, असे ट्वीट करत संदीप देशपांडेंनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. (MNS Sandeep Deshpande On Various delegation Meet Raj Thackeray)

समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शासनाकडून लादण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून अनलॉक अंतर्गत काही अंशी सूट देण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर जात राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या संघटनांनी विविध मागण्या केल्या आहेत. या मागण्यांवर राज ठाकरेंनी थेट संबंधित मंत्र्यांना फोन लावत त्यावर तोडगा काढला होता.

राज ठाकरेंना आतापर्यंत कोण कोण भेटलं?

  • बेस्टचे कंत्राटी कर्मचारी
  • केबलचालक
  • कोळी बांधव
  • बँडवाले
  • वारकरी
  • मूर्तीकार
  • डबेवाले
  • जिमचालक
  • कोळी महिला
  • वीजबिल ग्राहक
  • पुजारी
  • डॉक्टरांचे शिष्टमंडळ
  • ‘अदानी’चे अधिकारी

(MNS Sandeep Deshpande On Various delegation Meet Raj Thackeray)

संबंधित बातम्या :

कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी कृष्णकुंजवर, राज दरबारी गाऱ्हाणी

PHOTO : राज ठाकरे पहिल्यांदाच राजभवनावर, राज्यपाल कोश्यारींसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा