AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी कृष्णकुंजवर, राज दरबारी गाऱ्हाणी

यावेळी ते राज ठाकरेंसमोर मागण्यांचं गाऱ्हाण मांडणार आहे. (Koli, Musician and Warkari Various delegation Meet Raj Thackeray today)

कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी कृष्णकुंजवर, राज दरबारी गाऱ्हाणी
| Updated on: Nov 11, 2020 | 12:49 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे विविध संघटनांच्या प्रतिनिधी मागण्यांसाठी कृष्णकुंजवर दाखल होत आहे. आज मंगळवार (11 नोव्हेंबर) कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी आपल्या विविध मागण्या घेऊन कृष्णकुंजवर जाणार आहे. यावेळी ते राज ठाकरेंसमोर मागण्यांचं गाऱ्हाण मांडणार आहे. (Koli, Musician and Warkari Various delegation Meet Raj Thackeray today)

नुकतंच मुंबईतील कोळी बांधवांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसमोर विविध मागण्यांचं गाऱ्हाण मांडलं. या मागण्या ऐकल्यानंतर राज ठाकरेंनी मी सरकारशी याबाबत बोलेन असे आश्वासन दिले.

आज महाराष्ट्र वारकरी संप्रदाय पायिक संघाच्या महाराजांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यावेळी वारकीय संप्रदायाला कार्तिकी वारीसाठी परवनगी द्या, अशी मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे. चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या आषाढी यात्रा कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शासनाकडून लादण्यात आले होते. त्यावेळी वारकरी संप्रदायाकडून सामाजिक भान राखत वारी करण्यात आली होती. मात्र आता अनलॉक अतंर्गत कार्तिक वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जात आहे. याच मागणीसाठी वारकऱ्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहे.

त्याशिवाय बँड, घोडे, रथ आणि लग्नसमारंभासंबंधी इतर व्यवसाय सुरु करावा, या मागणीसाठी मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या शिष्टमंडळाकडून हा व्यवसाय सुरु करा, या मागणीसह इतरही मागणी केली जाणार आहे.

राज ठाकरेंना आतापर्यंत कोण कोण भेटलं?

  • बेस्टचे कंत्राटी कर्मचारी
  • केबलचालक
  • कोळी बांधव
  • बँडवाले
  • वारकरी
  • मूर्तीकार
  • डबेवाले
  • जिमचालक
  • कोळी महिला
  • वीजबिल ग्राहक
  • पुजारी
  • डॉक्टरांचे शिष्टमंडळ
  • ‘अदानी’चे अधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला! (Koli, Musician and Warkari Various delegation Meet Raj Thackeray today)

संबंधित बातम्या :

PHOTO : राज ठाकरे पहिल्यांदाच राजभवनावर, राज्यपाल कोश्यारींसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.