मुंबई: लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दूध दराचा मुद्दा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. शेतकऱ्यांकडून दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे 17 ते १८ रुपये देतात आणि स्वत: मात्र भरघोस नफा कमावतात. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 27 ते 28 रुपये दर मिळावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. (Raj Thackeray request to the Governor to pay attention to the milk issue )