AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: “मी सगळ्या तांड्यात पैसे दिले, म्हणून निवडणुकीत अजिबात भीती नाही”

निवडणुकीदरम्यान मतदारांवर कोणताही दबाव असू नये किंवा कोणतंही प्रलोभन असू नये यासाठी निवडणूक आयोग आदर्श आचार संहिता (Model Code of Conduct Violation) लागू करतं. मात्र, या आचारसंहितेला राजकीय नेत्यांकडून कायमच केराची टोपली (Model Code of Conduct Violation) दाखवली जात असल्याची प्रकरणं समोर येतात.

VIDEO: मी सगळ्या तांड्यात पैसे दिले, म्हणून निवडणुकीत अजिबात भीती नाही
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 16, 2019 | 5:12 PM
Share

जालना: निवडणुकीदरम्यान मतदारांवर कोणताही दबाव असू नये किंवा कोणतंही प्रलोभन असू नये यासाठी निवडणूक आयोग आदर्श आचार संहिता (Model Code of Conduct Violation) लागू करतं. मात्र, या आचारसंहितेला राजकीय नेत्यांकडून कायमच केराची टोपली (Model Code of Conduct Violation) दाखवली जात असल्याची प्रकरणं समोर येतात. भाजपचे परतूर मतदारसंघाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनीही (Babanrao Lonikar bribe Voters) असंच केल्याचं उघड झालं आहे. मी सगळ्या तांड्यात पैसे दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मला अजिबात भीती वाटत नाही, असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ (Babanrao Lonikar bribe Voters) चांगलाच व्हायरल होत आहे.

बबनराव लोणीकर म्हणाले, “सगळ्या तांड्यांमध्ये मी पैसे दिले आहेत. म्हणून मला या निवडणुकीत काहीही भीती वाटत नाही. आपण सगळे माझ्या सोबत आहेत. आपल्या सर्वांचा आशिर्वाद माझ्यासोबत आहे. आपण सर्वांनी रॅलीत यायचं आहे. मोदींच्या सभेला जायचं आहे.”

बबनराव लोणीकर यांचा पैसे दिल्याचं वक्तव्य करणारा व्हिडीओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच पैसे देऊन नागरिकांची मतं विकत घेणाऱ्या लोणीकरांवर निवडणूक आयोग काय कारवाई करणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच अशा कृत्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर हे प्रकार असेच वाढत जातील, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

राज्याची विधानसभेसोबत मागील काळात लोकसभा निवडणुकीतही आचारसंहिता भंगाची अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर अनेकांना नोटीसही देण्यात आल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाचे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या काळात ज्या धडक कारवाई झाल्या, तशा सध्या होताना दिसत नाही, अशीही तक्रार राजकीय जाणकार सांगतात. निवडणूक आयोगाचा धाक तयार होण्यासाठी आणि या आचारसंहिता भंगावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे लोणीकरांच्या प्रकरणात निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...