AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला संबोधन, काय म्हणाले मोदी? वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले. त्यात 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला संबोधन, काय म्हणाले मोदी? वाचा सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 11:38 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले. त्यात 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 3 जानेवारी 2022 पासून ह्या लसीकरणाला देशात सुरु होईल असही पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसरी मोठी घोषणा ही 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी त्यातही जे कोमॉर्बिड आहेत त्यांच्यासाठी केली. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्री कॉशनरी लस घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल असं पंतप्रधान म्हणाले. त्याची सुरुवात मात्र नव्या वर्षात 10 जानेवारीपासून करण्यात येईल असं मोदींनी जाहीर केलं. कोरोनाचा नवा व्हेरीएट ओमिक्रॉनमुळ जगभरात संसर्ग वाढतोय. देशातही रुग्णसंख्या वाढते आहे. कुणीही घाबरु जायचं कारण नाही आहे. सगळ्यांना सावध राहावं, सतर्क राहावं.  काळजी घ्यावी. असे त्यांनी देशातील जनतेला सांगितले आहे. तसेज देशातील कोरोनाची स्थिती आणि ओमिक्रॉनला थोपवण्याचा प्लॅनही मोदींनी सांगितला आहे.

देशातील बेड्सची स्थिती

देशात आता 18 लाख आयसोलेशन बेड्स आहेत. 5 लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स आहेत. 1 लाख 40 हजार आयसीयू बेड्स आहेत. देशात 3 हजारपेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन प्लांट आहेत. 4 लाख ऑक्सिजन सिलिंडर देशभरात दिले गेले आहेत. राज्यातला लागणारी बफर डोस तयार करण्यासाठी आपण सज्ज आहोत. चाचण्यांची क्षमता वाढवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. लसीकरण हे कोरोना संसर्गात महत्त्वाचं काम करत आहे. लसीकरणात भारतानं मैलाचा दगड पार केलाय. पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाची राज्य  असलेल्या गोवा, उत्तराखंड, हिमाचलमध्ये पहिल्या डोसचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे. लवकरच देशात नेसल आणि डीएनए लसीनाही मान्यता मिळणार आहे. अशीही माहिती यावेळी मोदींनी दिली आहे.

सध्या देशात कोरोनाची काय स्थिती?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 415 वर पोहोचली आहे. त्यापैकी 115 जण ओमिक्रॉनच्या संसर्गातून बरे देखील झाले आहेत. महाराष्ट्रातही (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 108 वर पोहोचली आहे. तर, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 42 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

देशात 415 ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 108, दिल्लीमध्ये 79, गुजरातमध्ये 43 , तेलंगाणा 38, केरळमध्ये 37, तामिळनाडूमध्ये 34, कर्नाटक 31, राजस्थानमध्ये 22, हरयाणा 4, ओडिशा 4, आंध्र प्रदेश 4 , जम्मू काश्मीर 3, पश्चिम बंगाल 3, उत्तर प्रदेश 2, चंदीगढ 1, लडाख1, उत्तराखंडमध्ये 1 रुगणाची नोंद झाली आहे.

चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.