भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग, महापौर म्हणतात, आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली?

भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानतंर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग, महापौर म्हणतात, आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली?
chitra wagh_Kishori Pednekar
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 1:34 PM

मुंबई : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानतंर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कायदा सुव्यवस्थेवरुन भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सडेतोड प्रश्न विचारले होते. मात्र आता भाजपची ताईगिरी कुठे गेली असा खडा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे. इतकंच नाही तर आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं म्हटलं आहे.

किशोरी पेडणेकर यांचा भाजपवर हल्लाबोल

भाजपच्या महिला आता गप्प का? दिव्याखाली अंधार आहे. भाजप नेहमीच महाराष्ट्राला बदमान करण्याचा प्रयत्नात असते. खोटं रडून दाखवता. भाजपशासित राज्यात महिलां अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत. आता ताईंगिरी कुठे गेली? फोन बंद का? असा हल्लाबोल महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केला.

मी स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार आहे, पोलिस स्टेशनला जाणार आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. केवळ महाराष्ट्र बदनाम करण्याचं काम भाजपकडून होतं. भाजपच्या ताई पब्लिक स्टंटसाठी पुढे येणार आणि आता गप्प बसणार? आज महिलांच्या विषयावर धाय मोकलून रडणा-या भाजपच्या ताईंचा फोन सकाळपासूनच स्विच ऑफ आहे, त्यांच्या पक्षातील कुणीच याबाबत बोलायला तयार नाही. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमीका घेतली पाहिजे, मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं, असा हल्लाबोल किशोरी पेडणेकर यांनी केला.

नेमकं प्रकरण काय?

भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्याची तक्रार आमदार आणि खासदार यांच्याकडे केली म्हणून नगरसेविका आणि सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप समाजसेविकाने केला आहे. या विरोधात महिनाभरापूर्वी तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नाही. अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दाद मागितल्यावर बोरीवली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला

पीडित महिलेला समाजसेवेची आवड असल्याने ती 2020 मध्ये खेडेकर यांच्या संपर्क कार्यालयात आली होती. तिथे तिची प्रतिक साळवीशी भेट झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. साळवीने या महिलेला 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास खेडेकर यांच्या वझिरा नाका येथील कार्यालयावर बोलविले आणि तिचा विनयभंग केला. त्याची तक्रार तिने स्थानिक खासदार आणि आमदार यांच्याकडे केली. हे कळताच नगरसेविका खेडेकर यांनी तिला फोन करून कार्यालयात बोलावून घेतले आणि तक्रार का केली? अशी विचारणा केली. साळवीने तिच्याशी केलेल्या अश्लील वर्तनाबाबत तिने खेडेकर तसेच इतर उपस्थितांना सांगितले. तेव्हा दुसऱ्या एका महिलेने तिला मारहाण केली. तसंच तिथे उपस्थित इतरांनीही तिला मारहाण करीत ऑफिस बाहेर हाकलले, असा आरोप पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.

सचिन सावंत यांचं ट्विट

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करुन भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग भाजप कार्यकर्त्याने केल्याचा दावा केला. इतकंच नाही तर भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार सुनील राणे यांच्याकडे तक्रार करुनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे बोरिवली पोलिसात तक्रार दिल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. यावेळी सचिन सावंत यांनी FIR ची कॉपीही ट्विट केली आहे.

भाजपाच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. आत्ता बोरीवली पो ठाण्यात भाजपा नगरसेविका कार्यालयात महिलेचा भाजपा कार्यकर्त्याने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दुर्दैव म्हणजे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार सुनील राणे यांच्याकडे तक्रार करून न्याय मिळाला नाही. इतर भाजपा नगरसेविका आणि नेत्यांनी तक्रार करणाऱ्या महिलेलाच मारहाण केली. ‌ महिला भाजपा कार्यालयात सुरक्षित नाहीत आणि तिलाच छळले जाते आणि अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घातले जाते. महिला विरोधी भाजपाचा जाहीर निषेध! ज्यांनी प्रकरण दाबले त्या भाजपा नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. ‌

गोपाळ शेट्टी यांचं स्पष्टीकरण

भाजप नगरसेवकाच्या कार्यालयाचा विनयभंग केल्याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात एका भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाला आता राजकीय स्वरूप आले असून काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही नेते एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. भाजपचे खासदार गोपाल शेट्टी म्हणाले की, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी, त्यांना माहित नाही की ही महिला 1 वर्षापूर्वी भाजपमध्ये पद घेण्यासाठी आली होती. आणि जर ही घटना 1 वर्षापूर्वी घडली असेल, तर ती महिला कोठे होती, जेव्हा ही घटना घडली, तर मग ती कार्यालयातून बाहेर का आली नाही आणि गोंधळ का निर्माण केला? असा प्रश्न गोपाळ शेट्टी यांनी विचारला.

खासदार गोपाल शेट्टी म्हणाले की, या दोघांची नार्को चाचणी झाली पाहिजे. जर नार्को चाचणीत भाजप कार्यकर्ता चुकीचा आढळला तर मी नाही तर संपूर्ण पक्ष त्या महिलेच्या पाठीशी उभा राहील, कोणत्याही महिलेसोबत अशी घटना घडू नये, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

संबंधित बातम्या 

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी चित्रा वाघ आक्रमक, महाविकास आघाडी सरकारकडे महत्वाची मागणी

आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.