AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या

बलात्कार आणि अमानुष अत्याचारानंतर गंभीर असलेल्या महिलेवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या महिलेची विचारपूस करण्यासाठी चित्रा वाघ जात होत्या. मात्र त्यापूर्वीच त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या
Chitra Wagh
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 12:45 PM
Share

Mumbai Rape मुंबई : मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या अक्षरश: ढसाढसा रडल्या. त्यांना या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अश्रू रोखता आले नाहीत.

बलात्कार आणि अमानुष अत्याचारानंतर गंभीर असलेल्या महिलेवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या महिलेची विचारपूस करण्यासाठी चित्रा वाघ जात होत्या. मात्र त्यापूर्वीच त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, “खरंतर मी आता निशब्द झाले, माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्द नाहीत. ज्या पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाला, तो राक्षसी होता. मी डॉक्टरांशी आता बोलले, मी तिला त्या ठिकाणी बघून आले अक्षरश: तिचे आतडे कापले गेले, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. ज्या पद्धतीमध्ये हे अत्याचार चालले ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले. महाराष्ट्र महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका.

हे मला सांगायचे गेल्या आठ दिवसांमध्ये आपण बघतोय किती अत्याचार झालेत. साडे तेरा वर्षाच्या मुलीवर ठाण्यासारख्या ठिकाणी अत्याचार झाले. आज सकाळीच अमरावतीमध्ये एका सतरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, सात महिन्यांची गर्भवती मुलगी तिने स्वतःला संपवून टाकलं.

साकीनाक्यातील महिला मृत्यूशी झुंज देत होती आणि आता तर तुम्ही तिला बघितलं, आपण काही करू शकलो नाही आहोत. आम्ही अलीकडे पलीकडे काही चालू शकले नाही आणि याच पद्धतीने त्याच्यामध्ये पद्धतीने या महिलेला मारले गेले ज्या पद्धतीने या महिलेवर अत्याचार झालेला आहे हे निश्चितपणे एका माणसाचे काम नाही.

राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला. अत्याचाराच्या या घटना थांबवण्यासाठी महिला अॅट्रोसिटी कायदा आणायला हवा, ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांवर अन्यायासाठी कायदा आहे, तसाच महिला अॅट्रोसिटीचा कायदा आणा, त्यासाठी कमिट्या स्थापन करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

साकीनाका बलात्कार पीडितेचा मृत्यू 

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

साकीनाका खैरानी रोड येथे काल रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

VIDEO :  मुंबई बलात्कार पीडितेचा मृत्यू

 संबंधित बातम्या 

Mumbai Sakinak Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या; पीडितेच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.