AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Sakinaka Rape : मुंबईला पुन्हा हादरवणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?

Mumbai Rape मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात पुन्हा एकदा दिल्लीतील निर्भयासारखा प्रकार घडला. एका महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. सध्या पीडित महिलेची प्रकृती गंभीर आहे.

Mumbai Sakinaka Rape : मुंबईला पुन्हा हादरवणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?
Sakinaka Police_Mumbai Rape
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 11, 2021 | 11:31 AM
Share

Mumbai Rape मुंबई : मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात पुन्हा एकदा दिल्लीतील निर्भयासारखा (Nirbhaya) प्रकार घडला. एका महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. सध्या पीडित महिलेची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर साकीनाका पीडित महिलेला भेटण्यासाठी राजावाडी रुग्णालयात पोहोचल्या.

पीडित मुलीची प्रकृती अजूनही गंभीर आहे, राजावाडी रुग्णालयाच्या डीन डॉ विद्या ठाकूर यांनी सांगितले की, “जर तिची प्रकृती थोडी सुधारली तरच तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र सध्यातरी या रुग्णालयातून दुसरीकडे हलवण्यासारखी परिस्थिती नाही”

महापौरांची प्रतिक्रिया

9 तारखेची घटना घडल्या नंतर महिलेला राजावाडी रुग्णालयात आणण्यात आलंय. महिला अत्यवस्थ आहे. महिलेची आई सध्या तिच्यासोबत आहे. त्यांनीच मला आता सांगितलंय ‘महिला 10 ते 12 वर्षापासून त्या पुरुषबरोबर राहत होती’. त्यांच्यात भांडण सुरू होतं, तो तिला मारहाण करत असल्याचं कळल्यावर स्थानिकांनी पोलिसांना बोलावून घेतलं. पोलीस घटनास्थळी जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन महिलेला रुग्णालयात दाखल केलं आहे. तिची स्थिती नाजूक आहे. इतकी क्रूरता का येते ? पोलिसांनी तत्परता दाखवली म्हणून महिलेचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

महिलेचा खूप रक्तस्त्राव झाला आहे. या महिलेला वाचवण्यासाठी डॉक्टर आटोकाट प्रयत्न करत आहेत

पोलीस आयुक्त स्वत: साकीनाका स्टेशनमध्ये

साकीनाका पोलीस देखील या प्रकरणाचा प्रत्येक प्रकारे तपास करत आहेत. काल रात्री मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः साकीनाका पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण घटनेची चौकशी केली.

पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात फक्त एक आरोपी समोर आला आहे. पोलीस संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत असले तरी पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास करत आहेत.

जर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली, तर तिच्या वक्तव्यानंतरच समजेल की या घटनेतील आरोपी एक होता की त्याच्यासोबत आणखी काही लोक सहभागी होते, असं पोलीस म्हणाले.

गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साकीनाका बलात्कार प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तिचा जबाब झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. जी काही कठोर शिक्षा आहे ती केली जाईलच, पोलीस खात्याला मी यासंदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये तपास सुरु आहेय. आणखी कोणी आरोपी आहेत का त्याचाही तपास घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात. या घटनेचा वेळोवेळी अहवाल मला द्या अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

चित्रा वाघ पीडित महिलेच्या भेटीला

दरम्यान, साकीनाका बलात्कार पीडितेच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ दुपारी 12:15 वाजता राजावाडी रूग्णालयात जाणार आहेत. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी वाघ यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

साकीनाका खैरानी रोड येथे काल रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित बातम्या 

मुंबईच्या साकिनाका परिसरात 32 वर्षीय महिलेवर बलात्कार, पीडितेच्या गुप्तांगावर वार, संतापजनक घटना 

आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, हत्या करत देहाची विटंबना, डोळे काढले, हाताची बोटं दगडाने ठेचले 

Follow Us
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?