AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, हत्या करत देहाची विटंबना, डोळे काढले, हाताची बोटं दगडाने ठेचले

महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या तीन घटना समोर आलेल्या असताना बिहारमध्ये तशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना देखील तितकीच भीषण आणि भयानक आहे.

आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, हत्या करत देहाची विटंबना, डोळे काढले, हाताची बोटं दगडाने ठेचले
बलात्कार करून चार वर्षाच्या चिमुरडीची क्रूर हत्या
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 4:57 PM
Share

पाटणा : महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या तीन घटना समोर आलेल्या असताना बिहारमध्ये तशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना देखील तितकीच भीषण आणि भयानक आहे. आरोपीने चिमुकलीवर फक्त बलात्कार केला नाही. तर तिची हत्या करत तिच्या देहाची विटंबना देखील केली. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या या अशा घटना दररोज वाढत असल्याने मुली-महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपी नराधमांना पोलिसांचा खरंच धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

नेमकं प्रकरण काय?

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. सफिया सराय पोलीस ठाणे क्षेत्रात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची ओळख लपविण्यासाठी तिच्या मृतदेहाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. नराधमाने मुलीच्या हत्येनंतर तिचे दोन्ही डोळे काढले. त्यानंतर तिचे बोटं दगडाने ठेचले. त्यामुळे संपूर्ण मुंगेर जिल्ह्यात या घटनेवर रोष व्यक्त केला जातोय.

मुलगी वडिलांसोबत गंगा घाटावर गेलेली, घरी परतत असताना तिच्यासोबत संतापजनक कृत्य

संबंधित बलात्काराची ही घटना 4 ऑगस्टला दुपारी घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेचे पिता हे मासेमारीचा व्यवसाय करतात. ते 4 ऑगस्टला देखील मासे पकडण्यासाठी गंगा घाटावर गेले होते. यावेळी त्यांची आठ वर्षीय चिमुकलीदेखील त्यांच्यासोबत गेली होती. पण वडिलांनी तिला काही वेळाने घरी जाण्यास सांगितलं. त्यानंतर ते नदीत उतरले होते. पण मुलगी घरी पोहोचलीच नाही. मुलीचे वडील घरी आल्यानंतर त्यांनी तिच्याविषयी विचारलं तेव्हा आपली मुलगी घरी आलीच नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मुलीचा शोध सुरु झाला.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

पीडित मुलीचा रात्रभर शोध घेण्यात आला. अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला सकाळी गावाबाहेर एका झाडाखाली मुलीचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळला. मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मुलीवर बलात्कार झाला का या संदर्भातील खरी माहिती समोर येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक SIT पथक स्थापन करण्यात आलं आहे.

पुण्यात आठवड्याभरता तीन भीषण घटना

दुसरीकडे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे देशातील मुली आणि महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागला आहे.

पुण्याच्या खेड तालुक्यातील घटना

पुण्याच्या खेड तालुक्यातील एका गावात 12 वर्षीय चिमुकलीवर 5 नराधमांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. तर एका आरोपीने वारंवार विनयभंग केला. आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार करत होते.प्रत्येक आरोपीने पीडित चिमुरडीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पीडितेवर अत्याचार केल्यानंतर धमकावत होते. त्यामुले पीडिता घरी कुणालाही अत्याचाराबद्दल सांगत नव्हती. दरम्यान, या प्रकरणी खेड पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. संबंधित घटना ही सामूहिक बलात्काराची नाही. त्यामुळे आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या : 

मुंबईत दिल्लीच्या निर्भया हत्याकांडाची पुनरावृत्ती, महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर पीडितेच्या गुप्तांगावर वार

पुणे जिल्ह्यात आठवड्याभरातील तिसरी भीषण घटना, 13 वर्षीय चिमुकलीवर चार जणांकडून वारंवार बलात्कार

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.