किरीट सोमय्यांमुळे माझ्या सासूचं निधन, किशोरी पेडणेकरांचा अत्यंत गंभीर आरोप

| Updated on: Oct 31, 2022 | 7:42 PM

बातम्यांच्या आघातामुळे पेडणेकर कुटुंबातील एकाचा बळी गेला आहे. सोमय्यांच्या आरोपांमुळेच सासूचं निधन झाल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

किरीट सोमय्यांमुळे माझ्या सासूचं निधन, किशोरी पेडणेकरांचा अत्यंत गंभीर आरोप
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा घोटाळ्याची प्रकरण बाहेर काढली आहे. माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांच्यावर सोमय्या यांनी घोटाळ्याचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी अशी मागणीच त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याच्या बातम्या सर्वत्र झळकत आहेत. अशातच किशोरी पेडणेकर यांच्या सासूचा मृत्यू झाला आहे. किरीट सोमय्यांच्या आरोपांमुळेच सासूचं निधन झाले असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

बातम्यांच्या आघातामुळे पेडणेकर कुटुंबातील एकाचा बळी गेला आहे. सोमय्यांच्या आरोपांमुळेच सासूचं निधन झाल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

माझ्यावरील SRA घोटाळ्याचे आरोप खोटे आहेत. या संदर्भाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

सोमय्या ट्रॅप आखतात, मात्र, मी त्यांना घाबरत नाही. मी उद्या पोलीस चौकशीला सामोरं जाणार असल्याचेही पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांनी खोटी कागदपत्रे दाखवून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील काही गाळे हडपल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

मुंबईच्या दादर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पेडणेकर या देखील चौकशीसाठी गेल्या होत्या. आता या सगळ्या घोटाळ्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फेत (ईओडब्ल्यू) चौकशी व्हावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.