Omraje Nimbalkar: ‘स्वखुशीने निर्णय नाही..’, ठाकरेंची साथ का सोडली? ओमराजेंनी मनातली खदखद मांडली!

विरोधात राहून विकासकामे होत नसल्याचे कारण त्यांनी दिले होते. आता पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत मोठे अन् महत्त्वाचे विधान केले आहे

Omraje Nimbalkar: स्वखुशीने निर्णय नाही.., ठाकरेंची साथ का सोडली? ओमराजेंनी मनातली खदखद मांडली!
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 08, 2026 | 3:00 PM

श्रीराम क्षीरसागर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी:

Dharashiv News:  ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चौफेर टिका झाली. ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओमराजेंची ओळख होती, मात्र ओमराजेंनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. विरोधात राहून विकासकामे होत नसल्याचे कारण त्यांनी दिले होते. आता पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत मोठे अन् महत्त्वाचे विधान केले आहे.

Loading...

म्हणून पक्ष सोडण्याचा निर्णय, ओमराजेंनी बोलून दाखवली खंत!

“माणूस निर्णय घेतो तेव्हा काहीनाकाही घडले असते. वेगळा निर्णय स्वखुशीने कोणी घेत नाही. नगरपंचायत असेल, जिल्हापरिषद असेल, पंचायत समिती असेल. एकही नगपालिका येण्याईतके आमचे काम वाईट असेल का? एकही पंचायत समिती न येण्याईतके आमचे काम वाईट होते का? आम्ही रोज लोकांमध्ये आहे. माझ्यासारखं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे याचा काय अर्थ काढायचा? असं म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी खंत व्यक्त केली. तसेच दोन्ही शिवसेनेचे नेते वेगवेगळे आहेत. शिवसेना एकत्र झाली तर सामान्य माणसाचे भले होईल. सर्व कार्यकर्त्यांच्या भावना त्याच आहेत,” असंही ओमराजे निंबाळकर यावेळी म्हणाले.

दुष्काळाची स्थिती गंभीर!

“राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. या कालावधीला एक वर्ष जाणार आहे. ग्रामीण भागातील लोकांवर कठीण प्रसंग आहे. मायक्रो फायनान्स कंपनीवाले लोकांच्या दारातून हालत नाहीत.त्यांना मी नम्रपणे सांगितले आहे की सक्तीने वसुली करु नका. कुणाला अडवून पैसे मागू नका, असे कोणी जर त्रास देत असेल, अर्वाच्च भाषा वापरत असेल तर फोन करुन सांगा, त्याच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल केला जाईल,” असं आवाहन निंबाळकर यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.

तसेच “दिवस सारखे नसतात. कधी सुख असते तर दुःख असते. येणारा प्रसंग जाणार आहे. 1972 चा दुष्काळही महाभीषण होता. लोकांनी त्यापरिस्थितीवरही मात केली आहे. येणाऱ्या परिस्थितीवर तोंड देणे हाच पुरुषार्थ आहे. आपण टोकाचे पाऊल उचलल्याने समस्या सुटत नाहीत. त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये,” अशी विनंतीही त्यांनी शेतकरी बांधवांना केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us