AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: 11 दिवसांनी आंदोलन मागे! सरकारच्या निर्णयानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Rohit Pawar: गेल्या 12 दिवसांपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता सरकराने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मोठा निर्णय घेतला. त्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rohit Pawar: 11 दिवसांनी आंदोलन मागे! सरकारच्या निर्णयानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rohit pawarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 7:53 AM
Share

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारात सुधारणा करण्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत. या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसलेले आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. “सरकारचे आभार मानतो, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्यात” असे ते म्हणाले.

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, उशीर नक्कीच झाला आहे. आमची मागणी निश्चित भीमनवार यांच्या राजीनाम्याची होती, मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेता आंदोलन स्थगिती करण्यात आले. आमची प्रमुख मागणी अध्यक्षांच्या राजीनाम्याची होती. मात्र इतर देखील मागण्या मान्य करून घेतल्या. आता यानंतर मी विदर्भाच्या दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहे. या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला.

सरकारला मुदत दिली

सर्वांनी एकजूटता दाखवली. सरकारचे आभार मानतो. त्यांनी मुलांच्या मागण्या मान्य केल्या. राजीनामा ही प्रमुख मागणी होतीच. चांगला अधिकारी आणाला तपासासाठी. आपण आयोगाच्या शुद्धीकरणासाठी समीती स्थापण केली. मुले 1 पाऊल मागे आले पण सरकार 10 पाऊल मागे आले. निश्चितच उशिर झाला आहे. पण सरकाने आमची मागणी मान्य केली. हा विजय मुलांच्या एकजूटीचा आहे. सर्व मुलांनी एकत्र येत लढा दिला. प्रमोद पाटिल यांच्यासह अनेकांनी मुलांना साथ दिली. पुण्यात एवढे लोक कधीच आले नव्हते. सरकारला मुदत दिली आहे. या नंतर आता येत्या काही दिवसात मी आता दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. यात अनेक मागण्या होत्या त्या मुलांनी माडल्या नव्हत्या त्या या मुलांचा डबल फायदा मुलांना झाला असे रोहित पवार म्हणाले आहेत.

सुधारणांसाठी समिती स्थापन

एमपीएससीमधील सुधारणांसाठी स्थापन होणाऱ्या चौकशी आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांची नियुक्ती प्रस्तावित आहे. माजी न्यायाधीश न्या. पी. डी. नाईक, प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे, सेवानिवृत्त सचिव गणेश पाटील आणि पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम यांचा या समितीत समावेश असेल. तुकाराम मुंढे हे समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. एमपीएससीच्या कामकाजातील त्रुटी आणि आवश्यक सुधारणांचा अभ्यास करून समिती दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप