AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘मी भुजबळांना ‘तो’ व्हिडिओ पाठवला, अर्ध्या तासात धमक्यांचा पाऊस..ठोकतो, गोळ्या झाडतो..’ टेकचंदांनींचे आरोप जशास तसे…

मला येणारे धमकीचे फोन हे भुजबळांच्या कार्यकर्त्यांचे होते, असं फोन करणाऱ्यांनीच सांगितलं. मेसेजमधूनही त्यांनी हेच सांगितल्याचा आरोप ललित टेकचंदानी यांनी केलाय.

Video | 'मी भुजबळांना 'तो' व्हिडिओ पाठवला, अर्ध्या तासात धमक्यांचा पाऊस..ठोकतो, गोळ्या झाडतो..' टेकचंदांनींचे आरोप जशास तसे...
बिझनेसमन ललित टेकचंदानी यांचे आरोपImage Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 01, 2022 | 1:57 PM
Share

सुनिल ढगे, मुंबईः माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी देवी सरस्वतीच्या (Saraswati) फोटोसंबंधी वक्तव्य केल्यानंतर त्यावर अनेकांनी आपले विचार मांडले. यापैकीच एक व्हिडिओ मी भुजबळांना पाठवला. त्यानंतर अर्ध्या तासातच मला धमक्यांचे फोन, मेसेज सुरु झाले. तुला गोळ्या झाडतो. तुझा पत्ता दे… हे लोक भुजबळांचे कार्यकर्ते असल्याचं सांगत होते, असा आरोप मुंबईतील चेंबुरचे व्यावसायिक ललित टेकचंदानी (Lalit Tekchandani) यांनी केले आहेत.

भुजबळांनी मला धमकी दिल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा भुजबळांविरोधात FIR दाखल केलंय. त्यांनी आधी समस्त हिंदुंची माफी मागावी, अशी भूमिका ललित टेकचंदानी यांनी घेतली आहे. Tv9 शी बोलताना त्यांनी केलेले आरोप… त्यांच्याच शब्दात…

भुजबळ साहेबांनी हिंदू साधू संतांविरोधात आणि सरस्वती मातेविरोधात स्टेटमेंट केले. भाषण दिली. मी कट्टर हिंदू आहे. मला दुःख झालं. पवित्र नवरात्र सुरु आहे. आमचे उपवास सुरु आहेत. हिंदु देवी देवतांवर बोलणे, पंडितांवर बोलणे.

पंडित, साधु संतांना उलटं-सीधं बोलणं… मला खूप धक्का बसला. मी खूप लहान माणूस आहे. मी काय करु शकतो. तर एक यूट्यूबचं चॅनेल आहे. त्या लोकांनी खूप सुंदर व्हिडिओ केलेत यावर. मला ते आवडलं. मी भुजबळांना फॉरवर्ड केलं…

ते फॉरवर्ड केल्यानंतर अर्ध्या तासात एक फोन आला. आई आणि बापाच्या नावावर शिवी दिली. मला सांगितलं तुझ्या घरी घुसून तुला गोळ्या ठोकणार. मी फोन कट केला.

त्यानंतर  3 मिनिटांनी पुन्हा फोन आला. आमचं दुबई कनेक्शन आहे. दुबईतून तुला ठोकतो. परत मी फोन कट केला. 7-8 मिनिटानंतर 20-25 मेसेज आले. भ… तुझा अॅड्रेस दे, लोकेशन पाठव. घरी घुसून मारु. रस्त्यावर पाडू.

मी भुजबळ साहेबांना सांगतो, हिंदू लोकांना मुघलही मिटवू शकले नाहीत. साहेब, तुम्ही म्हातारे झाले आहात. घरी राहून आराम करा. जेलमध्ये जाऊन आलात. खूप करप्शन केसेसमध्ये फसले आहात. हिंदूंना भडकवू नका… हिंदू पेटला ना….

तुम्ही हिंदूंची मतं घेऊन निवडून आलात. बिझनेस करून पैसे कमावला नाही. हिंदूंना दुखावू नका. हात जोडून विनंती आहे. हिंदूंची माफी मागा. आम्ही तक्रार मागे घेऊ.

भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा फोन होता, असं त्यांनी फोनवर सांगितलं. मेसेजमध्येही आम्ही भुजबळांचे कार्यकर्ते आहोत, असं सांगितल्याचं टेकचंदानी म्हणालेत.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...