AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election2022 ward 12 | मुंबई महापालिका निवडणुकीत बोरीवली नॅशनल पार्कच्या वॉर्डात शिवसेनेचं वर्चस्व, यंदाही भगवा फडकणार का?

महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 12 हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे.

BMC Election2022 ward 12 | मुंबई महापालिका निवडणुकीत बोरीवली नॅशनल पार्कच्या वॉर्डात शिवसेनेचं वर्चस्व, यंदाही भगवा फडकणार का?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2022 | 5:44 PM
Share

मुंबईः BMC Election2022 | ward 12| आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर कुणाची सत्ता येते अनेक आर्थिक गणितं अवलंबून असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या(Mumbai Municipal Corporation) निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना आणि भाजपमधील द्वंद्व यानिमित्ताने अधिकच चव्हाट्यावर आलेलं आहे. या सर्वांचे परिणाम महापालिका निवडणुकीच्या मतदानावर होणार हे नक्की. मागील वेळी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 (ward Number 12) मध्ये शिवसेनेची सत्ता होती. बोरीवली नॅशनल पार्कसारख्या पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मतरदारसंघावर शिवसेनेच्या गीता संजय सिंघन यांचा मागील निवडणुकीत विजय झाला होता. भाजप आणि मनसेच्या उमेदवाराला गीता सिंघन (Geeta Singhan) यांनी चांगलीच धुळ चारली होती. यंदादेखील शिवसेनेचा उमेदवार हा गड राखणार का, की भाजपचं पारडं जड होणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. मागील निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. आता महापालिकेची आरक्षण सोडत निघाली असून विविध वॉर्डांची स्थिती स्पष्ट झाली आहे. वॉर्ड क्रमांक 12 हा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे.

वॉर्ड क्रमांक 12 मधील भाग कोणते?

महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 मध्ये बोरीवली नॅशनल पार्क, कुलूपवाडी टाटा पॉवर हाऊस, मगाठाणे बस डेपो, आदी भाग येतो. मागील निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला या भागातील मतदारांनी निवडून दिलं होतं.

2017 मधील निकाल काय?

वॉर्ड क्रमांक 12- बोरिवली- नॅशनल पार्क

  • गीता संजय सिंघन- शिवसेना- 9005
  • विक्रम चोगले- भाजप-6695
  • शिवानी पवार- मनसे- 1064
  • अमोल नाइक- अपक्ष- 2356
  • अजय देसाई- राष्ट्रवादी काँग्रेस 745
  • हेमंत पांडे- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 788

मतदारांचा टक्का काय?

2011 मधील जनगणनेनुसार वॉर्ड नंबर 12 मध्ये सुमारे 58 हजार 692 एवढी लोकसंख्या आहे. तर अनुसूचित जातीचे 910 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 420 एवढी आहे.

वॉर्ड आरक्षित की खुला?

महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 12 हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

सुधीर फडके उड्डाण पूल व पश्चिम रेल्वे लाइनच्या जंक्शनपासून पश्चिम बाजूने लोकमोन्य टिळक रोडपर्यंत, डॉ. श्याम प्रसाद चौक, दत्तपाडा रोड, बोरसपाडा रोड, देरासार लेन, देवनगर, हरिदास नगर,, एसपीएम पार्क, रामदास सूत्राळे जंक्शनपर्यंत. उषा नगर रोड, प्रेमनगर रोड, देवीदास रोड, सुधीर फडके उड्डाण पूल, विवेकानंद नगर, पोईसर बस डेपो या प्रमुख ठिकाणे वस्ती किंवा नगरांचा समावेश होतो.

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्ष (Party)उमेदवार (Candidate)विजयी/आघाडी
शिवसेनागीता सिंघनविजयी उमेदवार
भाजपविक्रम चोगले-
काँग्रेसहेमंत पांडे-
राष्ट्रवादी काँग्रेसअजय देसाई-
मनसेशिवानी पवार-
अपक्ष-इतर--

Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....