BMC Election 2022 : प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच, यंदा कोण बाजी मारणार?

प्रभाग क्र. 9 मध्ये खरी लढत ही प्रमुख पक्षांमध्ये झाली असली तरी कॉंग्रेसच्या श्वेता कोरेगावकर यांना त्याच्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा मोठा फायदा झाला होता. राष्ट्रवादीचा उमेदवार या जागेसाठी उभा नव्हता. त्यामुळे मताचे विभाजन तर झाले नव्हते शिवाय एकीचा फायदा त्यांना झाला होता. त्यानंतर गेल्या 5 वर्षात येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपा असे स्पष्ट चित्र असले तरी वैशिष्ट्यपूर्ण प्रभागात नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.

BMC Election 2022 : प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच, यंदा कोण बाजी मारणार?
BMC
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 7:01 PM

मुंबई :  (Mumbai) मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वच प्रमुख पक्ष हे दावेदार आहेत. त्यामुळे दरवेळी या प्रभागावर लक्ष केंद्रीत असते. महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे तर दोन नंबरचा पक्ष म्हणून भाजपाने आपली ओळख निर्माण केली आहे. असे असले तरी 2017 च्या (BMC Election) निवडणुकीत या प्रभागात (Congress) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या श्वेता शरद कोरेगावकर यांनी बाजी मारली होती. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या प्रभागामध्ये काहीही होऊ शकते हे येथील मतदारांनी दाखवून दिले आहे. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षात रस्सीखेच झाली असली तरी 2069 मतांनी श्वेता शरद कोरेगावकर यांनी बाजी मारली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीने राजकीय समीकरणे बदलली असून याचा नेमका फायदा कुणाला होणार हे पहावे लागणार आहे.

कॉंग्रेसला राष्ट्रवादी पक्षाचाही फायदा

प्रभाग क्र. 9 मध्ये खरी लढत ही प्रमुख पक्षांमध्ये झाली असली तरी कॉंग्रेसच्या श्वेता कोरेगावकर यांना त्याच्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा मोठा फायदा झाला होता. राष्ट्रवादीचा उमेदवार या जागेसाठी उभा नव्हता. त्यामुळे मताचे विभाजन तर झाले नव्हते शिवाय एकीचा फायदा त्यांना झाला होता. त्यानंतर गेल्या 5 वर्षात येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपा असे स्पष्ट चित्र असले तरी वैशिष्ट्यपूर्ण प्रभागात नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे. 2017 सालच्या निवडणुकीत मनसेने ही जागा लढवली होती. यामध्ये मनसे विजयाच्या कोसो मैल दूर राहिली असली तरी क्रमांक 1 च्या आणि 2 नंबरच्या उमेदवारातील मताधिक्य ठरविण्यामध्ये महत्वाचा रोल निभावू शकते हे मात्र नक्की.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

शिवसेना-भाजपामध्ये चुरशीची लढत

या प्रभागामध्ये कॉंग्रेसच्या श्वेता कोरेगावकर या 2 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या होत्या. असे असले तरी दोन नंबरसाठी शिवसेनेचे सचिन म्हात्रे आणि भाजपाचे मोहन मिठबावकर यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली होती. सचिन म्हात्रे यांना 7363 मते मिळाली होती मोहन मिठबावकर यांना 7585 मते मिळवता आली होती. 222 मते ही भाजपाचे मोहन मिठबावकर यांना अधिक होती.त्यामुळे तीन नंबरच्या उमेदवाराला जी मते मिळतात त्यावरच येथील क्रमांक 1 च्या उमेदवराचे भवितव्य अवलंबून आहे.

हे सुद्धा वाचा

प्रमुख पक्षांमध्येच झाली लढत

मगासवर्गासाठी राखीव असलेल्या या 9 नंबर प्रभागामध्ये कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना आणि मनसे मध्येच लढत झाली होती. एकही अपक्ष 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उभा नव्हता. तर नोटाला 485 मतदारांनी पसंती दिली होती. त्यामुळे गोरेगाव पगोडा भागातील मतदार यंदा नेमकी बाजू पाहून पाहून कुणाला झुकते माप देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

गत निवडणुकीतले चित्र

<< श्वेता शरद कोरेगावकर (कॉंग्रेस)-9654

<< सचिन दामोदर म्हात्रे (शिवसेना)- 7363

<< मोहन मिठबावकर (भाजपा)- 7585

<< महेश लक्ष्मण नर (मनसे)-1248

<< नोटा – 485

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.