AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi Birthday: मर्मबंधातली ठेव ही… तुमचं कार्य माझ्यासाठी प्रेरणादायी!; भाजप नेत्याकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Chandrashekhar Bawankule on PM Narendra Modi Birthday : भाजप नेत्याकडून पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; मर्मबंधातली ठेव ही... तुमचं कार्य माझ्यासाठी प्रेरणादायी, बोधप्रद, अभिमानास्पद आहे.

PM Narendra Modi Birthday: मर्मबंधातली ठेव ही... तुमचं कार्य माझ्यासाठी प्रेरणादायी!; भाजप नेत्याकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
| Updated on: Sep 17, 2023 | 4:00 PM
Share

मुंबई | 17 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचं कार्य माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, असं म्हणत बावनकुळे यांनी मोदींच्या कार्याचं कौतुक केलंय. तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मर्मबंधातली ठेव ही… तुमचं कार्य माझ्यासाठी प्रेरणादायी, बोधप्रद, अभिमानास्पद आहे, असं म्हणत बावनकुळे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदींच्या कार्याचं कौतुक केलं आहे. एक व्हीडिओही चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेअर केलाय.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट

मर्मबंधातली ठेव ही !

संसदेच्या प्रवेशद्वारात, पायरीवर डोके टेकवून नमस्कार करीत असलेले नरेंद्र मोदीजी..  मी माझ्या डोळ्यांत साठवून ठेवले. राज्यघटनेला वंदन करणारे मोदीजी माझ्या मन:पटलावर कायमचे कोरले गेले…

अगदी परवा, चांद्रयान मोहीम फत्ते झाली त्यावेळी शास्त्रज्ञांसमोर हात जोडून ‘मला तुमचे दर्शन करायचे होते; त्यासाठी मी आलो.’ असे विनम्रपणे सांगून नतमस्तक झालेले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी म्हणजे जगाला लाभलेले वैज्ञानिक अधिष्ठान आहे.

हे सारे बघतो तेव्हा मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी म्हणजे माझ्या आयुष्याला मिळालेली दैवी देणगी आहे, याची जाणीव होते.

भारताच्या पराक्रमी भव्य ललाटावर सुवर्णाक्षरांनी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी हेच नाव कोरलेले आहे.. ‘ न भूतो ‘असा भारतमातेचा जयजयकार या सुपुत्राने जगभर गर्जवला आहे.

राष्ट्रतेजाने लखलखणाऱ्या या किमयागार नेत्याचे विलक्षण प्रभावी नेतृत्व समस्त भारतीयांना लाभले आहे, याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच आज, त्यांच्या जन्मदिनी मनःपूर्वक शुभेच्छा देताना कोटी कोटी कमलपुष्पाचा वर्षाव मी त्यांच्यावर करतो. मा. मोदीजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

परिश्रम, धैर्य, चिकाटी व आत्मविश्वासाने मोदीजींनी भारताला ज्या उंचीवर नेले, ही साधारण गोष्ट नाही. हा भारतीय सामर्थ्याचा शंखनाद आहे. विशाल ध्येय ठेवून देशबांधवांसाठी उल्लेखनीय कार्य केले पाहिजे, देशाच्या कल्याणासाठी आपला जन्म सार्थकी लागावा, जनतेच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत, देशाची भरभराट व्हावी, सुख-समृद्धी नांदावी, यासाठी आपला देह कारणी यावा, हा मनोदय करूनच मा. मोदीजी अखंडपणे देशसेवा करत आहेत. आपली प्रत्येक कृती देशाला आत्मनिर्भर करू शकते, ही भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात त्यांनी रुजवली.फक्त देशहिताचाच ध्यास धरला.

राष्ट्र प्रथम हा मंत्र हृदयात साठवला.!! मा. मोदीजी, जनतेला पक्के ठाऊक आहे ; आव्हान कितीही मोठे आणि कठीण असेना त्याचा निर्विवाद सामना आपणच करणार. आपल्या हेतू आणि कृतीवर या देशातील जनतेचा अढळ विश्वास आहे.

आपल्याला जन्मदिनाच्या पुनःश्च मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला निरामय दीर्घायुरारोग्य लाभो, ही प्रार्थना.

आपले कार्य माझ्यासाठी प्रेरणादायी, बोधप्रद, अभिमानास्पद आहे.

अनंत शुभेच्छा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.