AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2014 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच…; संजय राऊत यांचे गंभीर आरोप

Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रिपद आणि राज्यातील वातावरण; संजय राऊत यांचे गंभीर आरोप... इंडिया आघाडीच्या जागा वाटपात कोणतीही अडचण येणार नाही. आमची लढाई सत्तेसाठी नसून हुकूमशाही उधळून टाकण्यासाठी आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

2014 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच...; संजय राऊत यांचे गंभीर आरोप
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 13, 2023 | 11:47 AM
Share

मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील वातावरण असं कधीच नव्हतं. इतकं अस्थिर असुरक्षित जातीपातीमध्ये वाटलेलं सध्याचं वातावरण आहे. या सर्वांना जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे. ज्या दिवसापासून महाराष्ट्रात देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रमध्ये जातीपाती वाटला गेला. या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब या नेत्यांनी महाराष्ट्र एकसंध ठेवला. ते त्यंचा कौशल्य होतं. पण गेल्या दहा वर्षांमध्ये हा महाराष्ट्र फाटला गेला आहे. जाती-धर्मानुसार महाराष्ट्राचे तुकडे पडत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

हेच देवेंद्र फडणवीस पहिल्या कॅबीनेट मध्ये आम्ही धनगरांना आरक्षण देऊ असं सांगत होते. हेच फडणवीस आमच्या अडीच वर्षे सरकार असताना आमच्या आता सत्ता आली तर मराठ्यांना 24 तासात आरक्षण देऊ असं सांगत होते. हे सांगणारे देवेंद्र फडणवीस मग आता आरक्षण का देत नाहीत? त्यामुळे जरांगे पाटील यांची भूमिका ती योग्य आहे, असं म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे पाच राज्याच्या निवडणुकीसाठी दिल्ली दौरा जात आहे. जाऊ द्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत.पाच देशात देखील निवडणुका आहेत पक्षाने त्या ठिकाणी देखील पाठवलं. तर आम्हाला एक मराठी माणूस गेला. म्हणून आम्हाला आनंद आहे, असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

माझ्या हातात सत्ता द्या 24 तासात मराठा आरक्षण देतो. ओबीसींना आरक्षण देतो हे आपणच फुलबाजे उडवले होते. ते आता विझले आहेत. तुमचे फुलबाजे आश्वासनाचे विझले आहे का? सरकार त्यांच्यावरती दबाव का आणत आहे? तर संभाजीनगरमध्ये कॅबिनेट पहिली बैठक आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जात आहे 16 तारखेला मी संभाजीनगरमध्ये आहे. त्या कॅबिनेट बैठकीमध्ये कोणते अडथळे येऊ नये म्हणून जरांगे पाटलांना गुंडाळण्याचा काम चालू आहे. मी आधीच सांगितलं आहे. तो तरुण नेता गुंडाळल्यां जाणाऱ्यापैकी नाहीत, असं संजट राऊत म्हणाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?