AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Municipal Elections: महापालिका निवडणुकांबाबत मोठी बातमी, प्रभाग रचना करण्याचा सरकारचा आदेश

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्वाची बातमी आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.

Municipal Elections: महापालिका निवडणुकांबाबत मोठी बातमी, प्रभाग रचना करण्याचा सरकारचा आदेश
| Updated on: Jun 10, 2025 | 10:39 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्वाची बातमी आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. नगरविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने देण्यात आले आहेत. ही रचना झाल्यानंतर लवकरचं निवडणूकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सध्या प्रशासक नेमलेले आहेत. मात्र आता आगामी काळात निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रभाग रचना करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.

पुढील महापालिकांची प्रभाग रचना बदलणार

राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, अमरावती, अहिल्यानगर,अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी,जळगाव, नांदेड-वाघाळा, या महापालिकांची प्रभाग रचना बदलणार आहे.

ड वर्गातील महापालिकेतील प्रभाग रचना

ड वर्गातील महापालिकेत प्रभाग रचना ठरवताना शक्यतो सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत . मात्र, सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा ५ सदस्यांचा होईल किंवा दोन प्रभाग ३ सदस्यांचे होतील. यात अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकेचा समावेश आहे.

  • अ वर्ग महानगरपालिका – पुणे, नागपूर
  • ब वर्ग महानगरपालिका – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
  • क वर्ग महानगरपालिका – नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली

मुंबईतील प्रभाग रचना बदलणार नाही

मुंबई मध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. मात्र इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.