Muslim Reservation : ‘एमआयएम’चा 11 डिसेंबरला एल्गार, मुस्लिम आरक्षणासाठी ‘चलो मुंबई’चा नारा

औरंगाबादनंतर आता सोलापूरमधूनही मुस्लिम आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक देण्यात आलीय. 11 डिसेंबरला मुस्लिम आरक्षणासाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी मुंबईला जाणार आहोत, अशी घोषणा असदुद्दीन ओवेसी यांनी दिलीय.

Muslim Reservation : एमआयएमचा 11 डिसेंबरला एल्गार, मुस्लिम आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा
असदुद्दीन ओवेसी, अध्यक्ष, एमआयएम
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 4:02 PM

मुंबई : राज्यात मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही समोर आलाय. एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलीय. औरंगाबादनंतर आता सोलापूरमधूनही मुस्लिम आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक देण्यात आलीय. 11 डिसेंबरला मुस्लिम आरक्षणासाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी मुंबईला जाणार आहोत, अशी घोषणा असदुद्दीन ओवेसी यांनी दिलीय. (Asaduddin Owaisi and Imtiaz Jalil warn of Thackeray agitation in Mumbai for Muslim reservation)

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणायचे की एमआयएमला मत देऊ नका. भाजपला मत देण्यासारखं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणायचे की एमआयएमला मत देऊ नका, शिवसेना आणि भाजपला फायदा होईल. त्याचा परिणामही झाला. सोलापुरात काहींनी त्याला खरं समजलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आम्हाला भाजपची बी टीम म्हटलं. जेव्हा सत्ता स्थापना करावी लागली तेव्हा हेच लोक एकत्र आले आणि म्हटले आपण सगळे एक आहोत आणि मुसलमांना धोका नाही. शिवसेना सेक्युलर नाही. ते भाजपसारखेच जातीयवादी आहेत. पवार साहेब सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? राहुल गांधी सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? तुम्ही विसरलात का 1992 ला काय झालं? असा सवाल ओवेसी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केलाय.

‘उद्धव ठाकरेंना ओवेसींचा आक्रमक सवाल’

शिवसेनेला तुम्ही सेक्युलर बनवलं आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात. तिन्ही एकत्र येऊन सरकार चालवतात आणि म्हणतात सेक्युलॅरिझम वाचवायचं आहे. उद्धव ठाकरे विधानसभेत मंदिर आणि मशिदीबाबत बोलतात. तुम्हाला लाज वाटत नाही? उद्धव ठाकरे सभागृहात म्हणतात की बाबरी मशिद आम्ही पाडली. तेव्हा सेक्युलर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाज वाटली नाही? असा आक्रमक सवाल ओवेसी यांनी विचारला आहे.

‘एक पेन तुम्हाला जिवंत ठेवेल, तलवार नाही’

त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विसरली काय? आता मुस्लिमांच्या आरक्षणाची चर्चाच होत नाही. चर्चा केली जाते ती वानखेडेची. तो मुसलमान आहे किंवा नाही. अरे या मुसलमांना आरक्षण हवं त्याचं काय? आणि का हवंय मुसलमानांना आरक्षण… तुमच्याकडे किती लोकांच्या खिशात पेन आहे? हीच परेशानी आहे मुसलमानांकडून. पेन ठेवा खिशात, लिहा. पेन ठेवा खिशात. तो तुम्हाला जिवंत ठेवेल, तलवार जिवंत ठेवणार नाही, पेन ठेवेल, अशा पोटतिडकीचा सल्लाही ओवेसी यांनी मुस्लिम बांधवांना दिला आहे.

इतर बातम्या :

‘नाचता येईना, अंगण वाकडं’ अशी सरकारची अवस्था, प्रीतम मुंडेंची टीका, ओबीसी आरक्षणावरुन घणाघात

‘तलवार नही, कलम जिंदा रखेगी तुमको’, सोलापुरात ओवेसींकडून ‘फुले आंबेडकरांचा’ धडा, नेमके काय म्हणाले?

Asaduddin Owaisi and Imtiaz Jalil warn of Thackeray agitation in Mumbai for Muslim reservation