
मुंबई – बाळासाहेबांवर माझे प्रेम आहे. हे प्रेम राजकीय किंवा बेगडी नाही. भाजप -शिवसेना एकत्र यावेत या इच्छेतून मी बाळासाहेंबावर प्रेम करतो असे नाही. असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये जमीनअस्मानचा फरक आहे. मी मुंबईमध्ये राहातो, माझ्या घराच्या चारही बाजुने मुस्लिम वस्ती होती. जेव्हा दंगे व्हायचे तेव्हा भीतीचे वातावरण असायचे मात्र त्याकाळची शिवसेना आम्हाला पंधरा-पंधऱा दिवस माझ्या घरापासून जवळच असलेल्या नारळवाडी परिसरात सुरक्षीतपणे स्थलांतरीत करायची. बाळासाहेब असताना आम्हाल कशाचीही भीती नव्हती. म्हणूनच माझे बाळासाहेबावरील प्रेम हे राजकीय नसून, त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, भाजपाला शिवसेनेसोबत जाण्याची बिलकूल इच्छा नाही. आम्हाला शिवसेनेचा व्यवहार पटत नाही. राज्यात जे काय चालू आहे ते चुकीचे चालू आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. बाळासाहेबाची शिवसेना आणि या सध्याच्या शिवसेनेमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत युती करणार नाही.
दरम्यान महाराष्ट्रच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठक मंगळवारी (16 नोव्हेंबर) मुंबईत होणार आहे. या बैठकीत भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण आणि महाविकास आघाडी सरकारकडून झालेली जनतेची फसवणूक या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन पक्षाची आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. तशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी दिली. ते मुंबईत बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल.
शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत
VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन