नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन, पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंची कारवाई

| Updated on: Jul 25, 2021 | 8:08 AM

गज्जू यादव हे नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव होते. मात्र पक्षशिस्त मोडून गैरवर्तन केल्याच्या कारणास्तव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यादव यांचे पक्षातून निलंबन करण्याचे आदेश दिले.

नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन, पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंची कारवाई
नाना पटोले
Follow us on

नागपूर : पक्षशिस्त मोडल्याच्या कारणास्तव नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ही कारवाई केली. जिल्हा परिषद सदस्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात काँग्रेस (Congress) पदाधिकारी गज्जू उर्फ उदयसिंग यादव (Gajju aka Udaysingh Yadav)  यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत वाद झाला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाची काँग्रेस कमिटीकडून अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. पक्षशिस्त मोडून गैरवर्तणूक केल्याचा ठपका गज्जू यादव यांच्यावर ठेवण्यात आला.

गज्जू यादव हे नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव होते. मात्र पक्षशिस्त मोडून गैरवर्तन केल्याच्या कारणास्तव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यादव यांचे पक्षातून निलंबन करण्याचे आदेश दिले.

निलंबनाच्या पत्रात काय म्हटलंय?

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत गज्जू उर्फ उदयसिंग यादव यांनी पक्षशिस्त मोडून गैरवर्तन केल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि नागपूर प्रभारी चंद्रकांत हंडोरे आणि निवडणूक निरीक्षक रणजीत कांबळे यांनी सादर केल्यावरुन गज्जू यादव यांना पक्षातून निलंबित करण्याचे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

नाना पटोले फडणवीसांना आव्हान देणार?

दरम्यान, पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवेन असं वक्तव्य नुकतंच नाना पटोले यांनी केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नाना पटोले देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

संबंधित बातम्या :

नाना पटोले फडणवीसांच्या विरोधात नागपूर दक्षिण-पश्चिममधून शड्डू ठोकणार? आढावा बैठकीत पटोलेंचं मोठं विधान

फडणवीसांच्या नागपुरात काँग्रेसच्या जोर बैठका, नाना पटोलेंच्या मार्गदर्शनाला नितीन राऊतांची गैरहजेरी!

(Nagpur District Congress General Secretary Gajju aka Udaysingh Yadav expelled from Party Nana Patole orders)