AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांच्या नागपुरात काँग्रेसच्या जोर बैठका, नाना पटोलेंच्या मार्गदर्शनाला नितीन राऊतांची गैरहजेरी!

नागपूरच्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नाना पटोले यांचं मार्गदर्शन लाभलं. पण या बैठकीला नितीन राऊतांची मात्र गैरहजेरी होती. 

फडणवीसांच्या नागपुरात काँग्रेसच्या जोर बैठका, नाना पटोलेंच्या मार्गदर्शनाला नितीन राऊतांची गैरहजेरी!
नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरात काँग्रेस बैठक
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 2:59 PM
Share

नागपूर : काँग्रेसने नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरु केलीय. नागपूर महानगरपालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. ही सत्ता उलथलण्यासाठी काँग्रेसने जोर लावलाय. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नाना पटोले यांचं मार्गदर्शन लाभलं. पण या बैठकीला उर्जामंत्री आणि नागपूरमधील स्थानिक नेते नितीन राऊतांनी (Nitin Raut) मात्र गैरहजेरी होती.

नाना पटोलेंच्या मार्गदर्शनाला नितीन राऊतांची गैरहजेरी!

यंदा काहीही करुन नागपूर महापालिकेवरचा भाजपचा झेंडा खाली उतरवायचा, असा निश्चय काँग्रेसने केला आहे. आतापासूनच काँग्रेस नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. त्याच अनुषंगाने आजची महत्त्वाची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलावली. पण या बैठकीला काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते उर्जामंत्री नितीन राऊतांनीच गैरहजेरी लावली.

नाना पटोलेंचं काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

काँग्रेसने नागपूर महानगरपालिका निवडणूकीची तयारी सुरु केलीय. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या आणि भाजपला टक्कर देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिले.

फडणवीसांच्या मतदारसंघातून भाजपला हादरे देण्याची व्यूव्हरचना

पहिल्या दिवशी नागपुरातील तीन विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकांचं नियोजन करण्यात आलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघातून नाना पटोले यांनी आढावा बैठकी घ्यायला सुरुवात केली. म्हणजेच राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघातूनच भाजपला हादरे देण्याची व्यूव्हरचना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आखली.

(Congress Meeting in Nagpur Presence of Nana Patole Nitin Raut Absent)

हे ही वाचा :

पूर आणि दरडीमुळे राज्यात 76 मृत्यू, 59 बेपत्ता, 90 हजार लोकांचं स्थलांतर, 75 जनावरे दगावली: अजित पवार

पूर आणि दरडग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.