पूर आणि दरडग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

कोकणासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना तातडीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करा. (devendra fadnavis)

पूर आणि दरडग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 1:34 PM

मुंबई: कोकणासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना तातडीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (devendra fadnavis demand maharashtra government to help flood affected people)

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत करण्यात यावी. तसेच नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत द्यायला हवी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘रिस्क असेसमेंट‘ तयार करा

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटं पाहता थोडा दूरगामी विचार सुद्धा राज्य सरकारने करण्याची गरज आहे. तळिये या गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात. असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. इतर धोकादायक गावे तत्काळ ओळखून, त्यासाठीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये ‘रिस्क असेसमेंट‘ तातडीने करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी फडणवीसांनी केली.

कोकणासाठी स्वतंत्रं आपत्ती व्यवस्थापन असावं

कोकणची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटं पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात यावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

76 लोकांचा मृत्यू

दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, रायगड, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, सातारा सांगली, मुंबई उपनगरे असे नऊ जिल्हे बाधित झाली आहेत. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात 209, सांगली 92, सातारा 120 आणि पुण्यात 421 गावे बाधित झाली आहेत. राज्यात आतापर्यंत 76 लोकांचा मृत्यू झाला आहे. विविध दुर्घटनेत आतापर्यंत 59 लोक बेपत्ता आहेत. तर 90 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. या दुर्घटनांमध्ये माणसंच नाही तर जनावरेही दगावली आहेत. आतापर्यंत विविध दुर्घटनेत 75 जनावरे दगावली आहेत.

दरडी कुठे कुठे कोसळल्या?

राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. साताऱ्यातील वाई तालुक्यात कोंडविडे आणि मौजेघर, महाडमध्ये तळीये, पोलादपूरमध्ये साखर सुतारवाडी आणि केवनाळे आणि पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबर्ली आणि ढोकवळी येथे दरडी कोसळल्या आहेत. घाटातही दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे घाट बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर माती आल्याने ताबडतोब माती काढण्याचं काम सुरू आहे. (devendra fadnavis demand maharashtra government to help flood affected people)

संबंधित बातम्या:

पूर आणि दरडीमुळे राज्यात 76 मृत्यू, 59 बेपत्ता, 90 हजार लोकांचं स्थलांतर, 75 जनावरे दगावली: अजित पवार

Maharashtra Rain Landslides LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव हेलिकॉप्टरमधून महाडकडे रवाना

Ambeghar landslide : 35 तासांनी दोन म्हशी बाहेर, यंत्रणा पोहोचणं अशक्य, टीव्ही 9 चा प्रतिनिधी 4 तास चालत आंबेघरमध्ये

(devendra fadnavis demand maharashtra government to help flood affected people)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.