AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, ऑपरेशन युवा सेना,14 पदाधिकारी आज शिंदे गटात!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आज हे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

विदर्भात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, ऑपरेशन युवा सेना,14 पदाधिकारी आज शिंदे गटात!
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 08, 2022 | 10:23 AM
Share

गजानन उमाटे, गोंदिया पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाने येथील ठाकरे गट फोडला आहे. या भागातील युवासेनेचे सात जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी आज बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव (Kiran Pandav) यांनी लावला आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईंच्या युवा सेनेला सुरुंग लावण्याचं काम केलंय.

पूर्व विदर्भातील म्हणजेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचीरोली जिल्ह्यातील युवा सेनेला मोठा धक्का या घटनेनं मोठा हादरा बसला आहे. विदर्भातील महत्त्वाचे तरुण कार्यकर्ते यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे राहतील. पूर्व विदर्भात खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात किरण पांडव यांनी ‘ॲापरेशन युवा सेना’राबवलं आहे. यात त्यांना मोठं यश आलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत लवकरच सर्वजण शिंदे गटाच प्रवेश करणार आहेत. हर्षल शिंदे, शुभम नवले, रोशन कळंबे, दिपक भारसागडे, कगेश राव, नेहा भोकरे, सोनाली वैद्य हे युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिंदे गटात जाणार आहेत. आज सर्व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

विदर्भातील कोण-कोण पदाधिकारी फुटले?

1) हर्षल शिंदे

युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर

2) शुभम नवले

युवासेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण

3) रोशन कळंबे

युवासेना जिल्हाप्रमुख भंडारा

4) दीपक भारसाखरे गडचिरोली

युवासेना जिल्हाप्रमुख

5) कगेश राव गोंदिया

युवासेना जिल्हाप्रमुख

6) नेहा भोकरे

युवतीसेना जिल्हाप्रमुख नागपूर

7) सोनाली वैद्य

युवतीसेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण

8) प्रफुल सरवान

जिल्हा समन्वयक नगरसेवक भद्रावती चंद्रपूर जिल्हा

9) राज तांडेकर

जिल्हा समन्वयक नागपूर

10) लखन यादव

जिल्हा समन्वयक रामटेक

11) कानाजी जोगराणा

जिल्हा चिटणीस नागपूर

12) अभिषेक गिरी

उप-जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण

13) सुनील यादव

रामटेक विधानसभा समन्व्यक

१४) ऋषभ विनोद मिश्रा

गोंदिया युवा सेना जिल्हा प्रमुख

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान