AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election 2022, Ward-18 : भेटीगाठी, संवाद आणि सेटिंग; प्रभाग क्रमांक 18मध्ये काय होणार?

NMC Election 2022, Ward-18 : पूर्वी नागपुरात चार वॉर्ड सिस्टिम होती. आता तीन वॉर्ड सिस्टीम झाली आहे. तसेच आरक्षणही पडलं आहे. आधीच एक वॉर्ड कमी झाल्याने टेन्शनमध्ये आलेल्या नगरसेवकांच्या पदरी अजून एक निराशा पडली आहे. या तीन वॉर्डांपैकी एकच वॉर्ड जनरल असणार आहे.

NMC Election 2022, Ward-18 : भेटीगाठी, संवाद आणि सेटिंग; प्रभाग क्रमांक 18मध्ये काय होणार?
भेटीगाठी, संवाद आणि सेटिंग; प्रभाग क्रमांक 18मध्ये काय होणार?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 20, 2022 | 8:49 AM
Share

नागपूर: महापालिका निवडणुकीचे आरक्षण (NMC Election 2022) पडल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी अंग झटकून काम करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सत्तेचा सारीपाट बदलल्यानेही इच्छूकांमध्ये चुळबूळ उडाली आहे. आतापासूनच या नगरसेवकांनी (corporator) सेटिंग लावायला सुरुवात केली आहे. खास करून प्रभाग 18मध्ये अधिकच चुळबूळ सुरू असल्याचं दिसत आहे. पूर्वी नागपुरात (nagpur) एका प्रभागात चार वॉर्ड होते. आता तीन झाले आहेत. त्यामुळे आपलीच या प्रभागात वर्णी लागावी म्हणून इच्छूक आणि आजीमाजी नगरसेवकांनी सेटिंग लावण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर मतदारसंघात आतापासून भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यातही राज्यात पुन्हा भाजपची सत्ता असल्याने भाजपकडे इच्छुकांची सर्वाधिक वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, भाजप नेतृत्व कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आधी काय होतं?

यापूर्वीच्या प्रभाग क्रमांक 18मधून मागच्यावेळी चार नगरसेवक निवडून आले होते. प्रभाग 18 अ मधून भाजपचे प्रविण दतके, प्रभाग 18 ब मधून भाजपच्या सुमेधा देशपांडे, प्रभाग 18 क मधून भाजपच्या नेहा वाघमारे आणि प्रभाग 18 ड मधून काँग्रेसचे बंटी ऊर्फ ऋषीकेश शेळके या विजयी झाल्या होत्या. या चारपैकी तीन वॉर्डावर भाजपने कब्जा केला होता. तर एका वॉर्डात काँग्रेसने विजय संपादन केला होता. या प्रभागाचं वैशिष्ट्ये म्हणजे या प्रभागात चारपैकी दोन महिला आणि दोन पुरुष विजयी झाले आहेत.

प्रभाग क्रमांक 18 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/इतर

एकाच वॉर्डात पुरुषांना संधी

पूर्वी नागपुरात चार वॉर्ड सिस्टिम होती. आता तीन वॉर्ड सिस्टीम झाली आहे. तसेच आरक्षणही पडलं आहे. आधीच एक वॉर्ड कमी झाल्याने टेन्शनमध्ये आलेल्या नगरसेवकांच्या पदरी अजून एक निराशा पडली आहे. या तीन वॉर्डांपैकी एकच वॉर्ड जनरल असणार आहे. त्यामुळे या एकाच वॉर्डात पुरुषांना संधी मिळणार आहे. प्रभाग 18 अ हा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. प्रभाग 18 ब हा वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. तर प्रभाग 18 क हा वॉर्ड जनरल झाला आहे.

कुठून कुठपर्यंत?

प्रभागाची फेररचना झाल्याने प्रभाग क्रमांक 18ची व्याप्तीही स्पष्ट झाली आहे. हा प्रभाग बाबा फरीदनगर, गोरेवाडा, राष्ट्रसंत नगर, गीतानगर, गायत्रीनगर, स्नेहनगर, प्रकाशनगर, झिंगाबाई टाकळी, गजानन नगर, उत्थाननगर, महानुभाव नगर, गोकुल सोसायटी, ईरोज हौसिंग सोसायटी, नटराज सोसायटी, गुलशन नगर, स्वागत नगरपर्यंत हा वॉर्ड पसरलेला आहे.

प्रभाग क्रमांक 18 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/ इतर

लोकसंख्या काय?

या प्रभागात 44 हजार 574 मतदार आहेत. त्यात अनुसूचित जातीचे 6548 तर अनुसूचित जमातीचे 2449 मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही अर्धा लाख मतदार तीन नगरसेवक निवडून देणार आहेत.

प्रभाग क्रमांक 18 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/इतर
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.