AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC election 2022 : नवा प्रभाग, नवा नगरसेवक? वाचा, नागपूर महापालिकेच्या प्रभाग 49विषयी सविस्तर…

हा प्रभाग नव्याने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रभागात कोणत्या राजकीय पक्षाची चलती असेल, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

NMC election 2022 : नवा प्रभाग, नवा नगरसेवक? वाचा, नागपूर महापालिकेच्या प्रभाग 49विषयी सविस्तर...
नागपूर महापालिका, वॉर्ड 49Image Credit source: tv9
| Updated on: Aug 08, 2022 | 8:30 AM
Share

नागपूर : भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (NMC election 2022) भाजपासह विविध पक्षांनी कंबर कसली आहे. मागील वेळी भाजपाने याठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले होते. यावेळी कोणता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरेल, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मागील वेळी 38 प्रभागांमधून नगरसेवक निवडून आले होते. यावेळी प्रभाग (Ward structure) वाढवण्यात आले आहेत. ही निवडणूक 151 जागांसाठी 52 प्रभागांत होणार आहे. वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता ही प्रभागसंख्या वाढवण्यात आली आहे. या वाढलेल्या प्रभागात भाजपा यश मिळवते, की काँग्रेस आणि मित्रपक्ष हे पाहावे लागणार आहे. यावेळी प्रभागरचनेसह आरक्षणातही मोठा बदल झाला आहे, त्यामुळे राजकीय पक्षांच्या (Political parties) उमेदवारांसमोर आपला सेफ प्रभाग टिकवून ठेवण्याचे आव्हान असणार आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 49ची अंबानगर, योगेश्वरनंगर, दिघोरी, रामकृष्णनगर, टेलिफोननगर, बेलदारनगर, गांधीनगर, म्हाळगीनगर, बेसा पॉवर स्टेशन, भाग्यश्रीनगर, अन्नपूर्णानगर, कॉर्पोरेशन कॉलनी, सन्मार्ग नगर, किर्तीनगर, प्रगतीनगर, वैभवनगर, बिरसानगर अशी व्याप्ती आहे. तर दिघोरी चौक, खरबी तौर, केक बेकर्स, मार्कंडेय मोटर्स, स्वामी गजानन शाळा, उमरेड रोडवरील पांडे कॉम्प्लेक्स, लालजी दुबे केटरर्स, हुडकेश्वर रोडवरील पडोळे सभागृह आदी महत्त्वाची ठिकाणे येतात.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग क्रमांक 49मधील एकूण लोकसंख्या 46,520 आहे. यात अनुसूचित जातीची एकूण संख्या 6525 असून अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या 2706 इतकी आहे. 2011नंतर जनगणना झालेली नाही. कोविडकाळामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आधीच्या लोकसंख्येत वाढलेली संख्या गृहीत धरण्यात आलेली आहे.

कोण मारणार बाजी?

हा प्रभाग नव्याने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रभागात कोणत्या राजकीय पक्षाची चलती असेल, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

प्रभाग 49 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 49 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 49 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आरक्षण कसे?

मागील वेळी असलेले आरक्षण यंदा बदलले आहे. हा प्रभाग नव्याने करण्यात आला आहे. यानुसार 49 अ आणि ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. तर क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी यावेळी राखीव ठेवण्यात आला आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.