महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी स्वीकाराल का? नाना पटोले म्हणतात…

| Updated on: Jan 04, 2021 | 7:44 PM

मला हायकमांडने कोणतीही जबाबदारी दिली, तर ती मी स्वीकारेन, असे नाना पटोले म्हणाले. (Nana Patole Comment On Congress New state President)

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी स्वीकाराल का? नाना पटोले म्हणतात...
Follow us on

नागपूर : कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यानंतर काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण याची चर्चा रंगू लागली आहे. यानंतर अनेकांकडून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे. नुकतंच नाना पटोले यांनी याबाबत टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. मला हायकमांडने कोणतीही जबाबदारी दिली, तर ती मी स्वीकारेन, असे नाना पटोले म्हणाले. (Nana Patole Comment On Congress New state President)

“विधानसभेचे अध्यक्षपद मी मागितलेलं नव्हतं. हायकमांडने मलाही जबाबदारी दिली. महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभेच्या अध्यक्षाची नोंद मीडियाने घेतलेली आहे. ते माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण याचा वापर जनतेच्या हितासाठी केला. त्यामुळे मी कोणतंही पद मागितलं नाही. जर त्यांनी जबाबदारी दिली, त्याला प्रामाणिकपणे पूर्णत्वास नेणे ही माझी जबाबदारी आहे,” असे नाना पटोले यांनी सांगितले.

“मी कोणतेही पद मागितलेले नाही. मला कोणीही काहीही सांगितलेलं नाही. त्याबद्दल चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही,” असेही नाना पटोले म्हणाले.

“नागपूर विधीमंडळाच्या कार्यालयाचा विदर्भाला फायदा” 

“नागपूर विधीमंडळाचे कार्यालय वर्षभर सुरु ठेवण्यात येणार आहे. या कार्यालयात उपसचिव, तसेच पूर्ण स्टाफ राहणार आहे. या ठिकाणी आजी माजी आमदारांचे कामकाज पूर्ण केले जातील. अद्यावयत लायब्ररी असून त्याचा उपयोग सार्वजनिक रित्या केला जाईल. त्याचा तरुण पिढीला उपयोग होईल. स्पर्धा परीक्षांमध्येही याचा उपयोगी ठरेल. ही ऐतिहासिक जी काही व्यवस्था आहे, त्याचा विदर्भाला फायदा व्हावा, याची मागणी होत होती. ती पूर्ण झाली,” असेही ते म्हणाले.

“नानाचा स्वभाव हा कृती करुन दाखवण्याचा आहे. फक्त बोलण्याचा नाही. त्याचं साक्षात विधीमंडळाचे कार्यालय सुरु करणे हे नानांच्या कृतीचं कार्य आहे. त्याच बोलणं आणि करण्यामध्ये काहीही हेतू नाही,” असेही नाना पटोलेंनी सांगितले.

“शासनाच्या कामाकाजातील काहीही स्थिती असेल ते शासन बघेल. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून त्यावर काही प्रतिक्रिया द्यावी, अशी काहीही भूमिका नाही,” असेही नाना पटोलेंनी म्हटलं. (Nana Patole Comment On Congress New state President)

संबंधित बातम्या : 

काँग्रेसी विचारांचा खराखुरा पाईक हरपला, विलासकाकांवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण भावूक

मनसेतही मेगाभरती सुरु, ‘कृष्णकुंज’बाहेर झुंबड, काही डबेवालेही ‘रेल्वे इंजिना’त!