मनसेतही मेगाभरती सुरु, ‘कृष्णकुंज’बाहेर झुंबड, काही डबेवालेही ‘रेल्वे इंजिना’त!

MNS | मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांची झुंबड उडल्याचं चित्र आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर गर्दी झाली आहे.

मनसेतही मेगाभरती सुरु, 'कृष्णकुंज'बाहेर झुंबड, काही डबेवालेही 'रेल्वे इंजिना'त!
मनसे प्रवेशासाठी झुंबड
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 12:21 PM

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी (BMC Election 2021) विविध पक्षांमध्ये मेगाभरती सुरु झाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसेही (MNS) मैदानात उतरली आहे. मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांची झुंबड उडल्याचं चित्र आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर गर्दी झाली आहे. पक्षप्रवेशासाठी कृष्णकुंजबाहेर अनेकांनी गर्दी केली. (Crowd gathered at Raj Thackerays residence Krushna Kunja to Join MNS)

बोरिवली विधानसभा क्षेत्रातील वकिलांचा मनसेत पक्षप्रवेश होत आहे. याशिवाय क्षितीज गृपचे सदस्य मनसेत पक्षप्रवेश करणार आहेत. मनसेने ज्या शाळेच्या फी वाढीविरोधात आंदोलन केलं, त्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पालकही मनसेवासी होत आहेत. इतकंच नाही तर डबेवाल्यांचे काही प्रतिनिधी मनसेत प्रवेश करुन ‘रेल्वे इंजिनात’ बसणार आहेत.

मनसे अॅक्शन मोडमध्ये

मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. मराठीसाठी आग्रह असलेल्या मनसेने अॅमेझॉनविरुद्ध मोहीम उघडली. त्यानंतर मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवून मराठीचा आग्रह धरला.

ग्रामपंचायत निवडणुका लढणार

राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विदर्भातही रणशिंग फुंकलं

भाजपचा गड असलेल्या नागपूर जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. गाव पातळीवरुन संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मनसेच्या एन्ट्रीमुळे नेमका कुणाचा फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, याचा फैसला 18 जानेवारीलाच होईल.

(Crowd gathered at Raj Thackerays residence Krushna Kunja to Join MNS)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.