Nandurbar Lok sabha result 2019 : नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निकाल

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. हिना गावित विजयी झाल्या. शेवटच्या अर्थात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी मतदान झालं. इथे यंदा 69 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 5 टक्क्यांनी मतदान वाढलं होतं. त्यामुळे वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हा प्रश्न होता. मात्र गावित यांच्या विजयाने या प्रश्नाचे उत्तरही […]

Nandurbar Lok sabha result 2019 : नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निकाल
नंदुरबार : हिना गावित
Follow us on

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. हिना गावित विजयी झाल्या. शेवटच्या अर्थात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी मतदान झालं. इथे यंदा 69 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 5 टक्क्यांनी मतदान वाढलं होतं. त्यामुळे वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हा प्रश्न होता. मात्र गावित यांच्या विजयाने या प्रश्नाचे उत्तरही मिळाले. या मतदारसंघात भाजपाकडून डॉ. हिना गावित, काँग्रेसकडून आमदार के. सी. पाडवी यांच्यात मुख्य लढत झाली. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. सुहास नटावडकर यांच्या उमेदवारीने रंगत वाढली होती.

पक्षउमेदवारनिकाल
अपक्ष/इतरदाजमल गजमल मोरे (VBA)पराभूत
भाजप/शिवसेनाहिना गावित (भाजप) विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीके. सी. पाडवी (काँग्रेस)पराभूत

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख लढत

नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या मतदारसंघात 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या डॉ विजकुमार गावित आणि डॉ हिना गावित यांनी भाजपात प्रवेश करीत, काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. 2014 मध्ये डॉ हिना गावित या एक लाख मतांच्या मताधिक्याने विजयी झाल्या. मात्र त्यावेळी काँग्रेस एकसंघ नसल्याचा फायदा त्यांना झाला होता. यावेळी सर्व काँग्रेस नेत्यांनी एकदिलाने ही निवडणूक लढवली आहे त्याचा परिणाम काँग्रेस बालेकिल्ला असलेल्या चार विधानसभा मतदारसंघात मतांची टक्केवारी वाढली आहे. ज्या शहरी भागाच्या मतावर भाजपा विसंबून होती, त्या ठिकाणी गेल्या वेळेपेक्षा कमी प्रमाणात मतदान झाल्याने, भाजपची धाकधूक वाढली.

विधानसभा मतदारसंघ निहाय  2019 आकडेवारी

मतदानाची टक्केवारी- 69.32

विधानसभा मतदारसंघ

  • अक्कलकुवा 00
  • शहादा 70
  • नंदुरबार 92
  • नवापूर 00
  • शिरपूर 00
  • साक्री 00

मागील निवडणुकीत काँग्रेस नेते स्वतः धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार होते. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते तिकडे प्रचारात होते. त्याचा परिणाम शिरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाल 50 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. या वेळी आमदार पटेल शिरपूरला तळ ठोकून असल्याने त्याचा फटका बसण्याचा अंदाज आहे. शिवाय शहरी भागात झालेलं कमी मतदान आणि डॉ सुहास नटावडकर यांनी केलेल मतविभाजन याचा फटका बसेल.

निवडणुकीतील वैशिष्ट्ये आणि सभा

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरपूर आणि साक्री येथे सभा झाल्या.

काँग्रेसच्यावतीने धडगाव आणि शिरपूर येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा झाली.

प्रचाराचे प्रमुख मुद्दे 

  • आदिवासी वसतिगृहात लागू करण्यात आलेली डीबीटी
  • St मधून दिलं जाणार धनगर आरक्षण
  • सिंचन सुविधा
  • या शिवाय भाजपाकडून मोदींच्या सभेनंतर आपलं मत थेट पंतप्रधान मोदींना अशी भावनिक खेळी, हेच प्रचारातील प्रमुख मुद्दे ठरले आहेत.

नंदुरबार हा पारंपरिक काँग्रेसचा गड शाबूत ठेवण्यासाठी आमदार के सी पाडवी यांना उमेदवारी देऊन, पहिल्यांदा सातपुड्यातील उमेदवार ही खेळी खेळली आहे. तर डॉ हिना गावित यांच्यासाठी भाजपने मोदींची सभा घेऊन मोदी कार्ड वापरलं आहे.