ईडीच्या चौकशीला घाबरून राणेंचा भाजपमध्ये पळ; शिवसेनेच्या वैभव नाईकांचा हल्लाबोल

नारायण राणेंची ईडी चौकशी होणार या भीतीने त्यांनी सरळ भाजपमध्ये पळ काढला.

ईडीच्या चौकशीला घाबरून राणेंचा भाजपमध्ये पळ; शिवसेनेच्या वैभव नाईकांचा हल्लाबोल
वैभव नाईक, शिवसेना आमदार

सिंधुदुर्गः “नारायण राणेंची ईडी चौकशी होणार या भीतीने त्यांनी सरळ भाजपमध्ये पळ काढला, त्यामुळे राणेंना संजय राऊत यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही”, अशी खरमरीत टीकाही शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik)यांनी राणेंवर केली. ते सिंधुदुर्गात माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलत होते. (Narayan Rane flees BJP Out Of Fear ED Inquiry; Says ShivSena Vaibhav Naik)

नारायण राणेंनी गेली दहा वर्षे अनेक आव्हाने आणि भविष्यवाणी केल्यात, काँग्रेसमध्ये असताना मी मुख्यमंत्री होणार त्यानंतर शिवसेना विसर्जित करणार, अशा वेगवेगळ्या घोषणा त्यांनी केल्या होत्या. या त्यांच्या घोषणांचं पुढे काय झालं हे लोकांना माहीत आहे, असं टीकास्त्रही वैभव नाईकांनी सोडलं. त्यामुळे राणेंच्या भविष्यवाणीला आता लोक काडीची किंमत देत नाहीत, अशा शब्दांत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणेंचा समाचार घेतलाय.

गेले एक वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असं राणे अनेक वेळा म्हणाले होते. मात्र एक वर्षाच्या कालावधीनंतर हे सरकार अजून भक्कम झालंय. तसेच भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार हे पुन्हा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत पुन्हा येतायत आणि पोटनिवडणूक लढवण्याची त्यांची मानसिकता तयारी झालीय, अशी माहितीही वैभव नाईकांनी दिलीय.

अनेक कार्यकर्ते राणेंना सोडून पुन्हा सेनेत येतायत : वैभव नाईक

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधीलसुद्धा अनेक कार्यकर्ते राणेंना सोडून पुन्हा सेनेत येतायत, ते आपल्यासोबत थांबले पाहिजेत. म्हणून राणेंची ही भविष्यवाणी सुरू आहे, स्वतःचं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठीच ही राणेंची धडपड सुरू असल्याचा दावा वैभव नाईक यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय.
तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची ईडी चौकशी झाली, मात्र ते शिवसेनेच्या बाण्यासारखे ईडीला सामोरे गेले. काय चौकशी करायची ती करा, पण आम्ही मान झुकवणार नाही, असं जाहीर आव्हान त्यांनी दिलंय.

26 जानेवारीला चिपी विमानतळ सुरू होणार

तसेच चिपी विमानतळासंदर्भात राणेंनी विरोधाची भूमिका कायम ठेवता कामा नये, मी पणाची भूमिका सोडली तर येणा-या 26 जानेवारीला चिपी विमानतळ सुरू होईल, आम्ही सर्वांना सोबत घेऊन हे विमानतळ चांगल्या प्रकारे सुरू राहील, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहितीही वैभव नाईक यांनी दिली.

संबंधित बातम्या

संजय राऊत नेहमी बडबड करतात, मग जाऊदेना जरा ईडीच्या समोर : नारायण राणे

Narayan Rane | राज्यातील मविआ सरकार कोसळणार, नारायण राणेंची नवी डेडलाईन

Narayan Rane flees BJP Out Of Fear ED Inquiry; Says ShivSena Vaibhav Naik

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI