हे स्थगिती सरकार, ठेकेदाराकडून पैसे उकळण्यासाठी हे सर्व सुरु; राणेंचा प्रहार

| Updated on: Dec 08, 2019 | 3:04 PM

भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडी सरकारला स्थगिती सरकार हे नाव दिलं आहे (Narayan Rane on Uddhav Thackeray and his government).

हे स्थगिती सरकार,  ठेकेदाराकडून पैसे उकळण्यासाठी हे सर्व सुरु; राणेंचा प्रहार
Follow us on

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडी सरकारला स्थगिती सरकार हे नाव दिलं आहे (Narayan Rane on Uddhav Thackeray and his government). ठाकरे सरकार विकास करण्यासाठी अस्तित्वात आलं नसून काम बंद करण्यासाठी आलं आहे. काम बंद करुन ठेकेदाराला बोलवायचं आणि पैसे उकळायचे असंच सर्व सुरु असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला. ते कणकवली येथे पत्रकारांशी बोलत होते (Narayan Rane on Uddhav Thackeray and his government).

नारायण राणे म्हणाले, “28 नोव्हेंबरला शपथविधी झाला. आज 8 डिसेंबर आहे. तरीही अजून यांचं खातेवाटप होऊ शकलेलं नाही. खातेवाटपच काय पण अजून मंत्रीही ठरलेले नाहीत. सध्या तीन पक्षांचे मिळून सरकार आलं आहे. त्यांना मी स्थगिती सरकार नावं ठेवलं आहे. या सरकारने मागील 10 दिवसात केवळ मेट्रो आणि त्यासारख्या अन्य विकास कामांना स्थगिती देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सध्या विकास कामं बंद पडली आहेत, ठप्प आहेत. हे सरकार विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी अस्तित्वात आलेलं नाही. कामं बंद करायची, ठेकेदाराला बोलावून घ्यायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनेच हे सर्व चाललं आहे. हे सरकार दीर्घ काळ चालणार नाही. हे काही महिन्याचं पाहुणं सरकार आहे.”

कोकणात अद्याप या सरकारचं अस्तित्वही कुठं दिसत नाही. कोकणातील विकासकामे ठप्प झाली आहेत. याला पूर्णपणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष जबाबदार आहेत, असाही आरोप राणेंनी केला.

नारायण राणे म्हणाले, “सध्या यांचा एक खासदार कोकणात बैठका घेत आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यात शिवसेना नाही. असं असतानाही शिवसेनेचा खासदार सिंधुदुर्गमध्ये शासकीय बैठका कसा घेतो? अधिकाऱ्यांना सुचना कशा करतो? हे जनतेसाठी, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी नाही, तर फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे विकासावर परिणाम होणार आहे.”

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येथील खासदाराने आढावा बैठका घेतल्या. खासदार अशा आढावा बैठका कुठल्या अधिकारात घेतो. केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यात शिवसेना नाही. सत्तारुढ पक्षाचा खासदार नसताना शासकीय अधिकाऱ्यांना आदेश कसे देऊ शकतो? विमानतळ 1 तारखेला चालू होणार हे त्यांनी कोणत्या अधिकारात सांगितलं? त्यामुळे शिवसेनेकडून बेकायदेशीर बैठका घेऊन आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. ही जनतेची दिशाभूल आहे, फसवणूक आहे. येणाऱ्या 15 ऑक्टोंबर ते 18 ऑक्टोंबरला आम्ही सिुंधुदुर्ग जिल्ह्यात आठही तालुक्यात गावभेटी घेणार आहोत. यात हे सरकार कसं विकासाला पोषक नाही हे सांगू, असंही राणे यांनी सांगितलं.