मोदी वाराणसीत म्हणाले, श्रीकृष्णाकडे गवळी होते, रामाकडे वानरसेना, शिवरायांकडे मावळे होते

| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

वाराणसी (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तुम्ही माझे कार्यकर्ते नाही तर मालक आहात.मोदी जिंकणं हरणं महत्त्वाचं नाही, तर बूथ कार्यकर्ता जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ‘माझा बूथ सर्वात मजबूत’ या दृष्टीने काम करा असं मोदी म्हणाले. जसे श्रीकृष्णाकडे गवळी होते, रामाकडे वानरसेना होती, छत्रपती शिवरायांकडे मावळे होते, तसेच […]

मोदी वाराणसीत म्हणाले, श्रीकृष्णाकडे गवळी होते, रामाकडे वानरसेना, शिवरायांकडे मावळे होते
Follow us on

वाराणसी (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तुम्ही माझे कार्यकर्ते नाही तर मालक आहात.मोदी जिंकणं हरणं महत्त्वाचं नाही, तर बूथ कार्यकर्ता जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ‘माझा बूथ सर्वात मजबूत’ या दृष्टीने काम करा असं मोदी म्हणाले.

जसे श्रीकृष्णाकडे गवळी होते, रामाकडे वानरसेना होती, छत्रपती शिवरायांकडे मावळे होते, तसेच आम्ही भारतमातेचे शिपाई आहोत, असं मोदी म्हणाले. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी-मावळ्यांसह भूमीचं रक्षण केलं, त्याप्रमाणे आम्ही सर्व भारतमातेचे शिपाई आहोत, असं मोदींनी नमूद केलं.

रेकॉर्ड तोडा

यावेळी मोदी म्हणाले, मे महिन्याच्या प्रचंड उष्म्यातही एक रेकॉर्ड तोडा. हा रेकॉर्ड मोदींना मत देण्याचा नव्हे तर मतदानाचा टक्का वाढवण्याचा आहे. पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान 5 टक्क्यांनी वाढायला हवं, असं मोदींनी नमूद केलं.

वाराणसी जिंकली, आता बूथ जिंकायला हवा.

कालच्या रोड शो दरम्यान मी जे चित्र पाहिलं, त्यामध्ये तुमचं कष्ट आणि घामाचा सुगंध होता. काशीच्या कार्यकर्त्यांनी इतक्या उष्म्यात मोदींसाठी घराघरात जाऊन आशीर्वाद मागितली. त्यामुळे वाराणसी जिंकली, आता बूथ जिंकायला हवा, त्यासाठी तुम्ही काम करा. मी म्हणतो देश झुकू देणार नाही, माझे कार्यकर्ते म्हणतील भाजपचा झेंडा झुकू देणार नाही, असं मोदींनी आवाहन केलं.

मी सुद्धा बूथ कार्यकर्ता होता. मलाही भिंतींवर पोस्टर चिटकवण्याचं सौभाग्य मिळालं.  देशभरातील कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, काशी घाटापासून पोरबंदरपर्यंत उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे देशातील जनता म्हणतेय पुन्हा एकदा मोदी सरकार, असं मोदींनी नमूद केलं.