ढाल तलवार चिन्ह असलेल्या शिंदे गटाचं पहिल्या ऑफिसचं कुठे झालं दणक्यात उद्घाटन?

ढाल तलवार चिन्हासह 'बाळासाहेबांची शिवसेना' या नावानं लिहिलेली कुठे सुरु झाली शिंदे गटाची पहिली शाखा?

ढाल तलवार चिन्ह असलेल्या शिंदे गटाचं पहिल्या ऑफिसचं कुठे झालं दणक्यात उद्घाटन?
शिंदेच्या पहिल्या शाखेचं उद्घाटनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 8:19 AM

रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई : एकनाथ शिंदे गटाचं ढाल-तलवार (Dhal Talvar) हे पक्ष चिन्ह असलेल्या पहिल्या कार्यालयाचं नवी मुंबईत उद्घाटन झालं. रविवारी नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये (Airoli, Navi Mumbai) या ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलं. ऐरोलीतल्या कार्यालयावर ढाल-तलवारीची भव्य  प्रतिकृती लावण्यात आलीय. कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले (Vijay Chougule) उपस्थित होते. मोठ्या उत्साहात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या उद्घाटनावेळी जल्लोष केला.

ऐरोली विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाने नवं ऑफिस सुरु केलं आहे. या ऑफिसमध्ये ढाल तलवार निशाणीची भव्य प्रतिकृती साकारण्यात आलीय. नवी मुंबईचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या हस्ते या निशाणीचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ढोल ताशाच्या गजरात पक्षाला मिळालेल्या नव्या चिन्हाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून ठाकरे गट आणि शिंदे गट यांना तात्पुरत्या स्वरुपात पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यात आलं आहे. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, असं नवं नाव निवडणूक आयोगानं दिलं. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे हे नवं नाव दिलं. शिवसेनेला मशाल हे चिन्हा एकीकडे देण्यात आलं असून शिंदे गटाला ढाल तलावर हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलंय.

शिंदे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार ठाकरे गटाच्या विरोधात उभा केला जाईल, असं सांगितलं जात होतं. मात्र अखेर शिंदे गटाने आपला उमेदवार न देता त्यांनी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला आहे. तर ठाकरे गटाकडून ऋतुजा पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, या पार्श्वभूमीरही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Non Stop LIVE Update
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.